Kothe Politic's : सोलापुरात काका-पुतण्याला आमदारकीची संधी; विधानसभेच्या इतिहासात नाव कोरणार?

Assembly Election 2024 : सोलापूरच्या इतिहासात विधानसभा निवडणूक विशेष ठरणार असून कोठे कुटुंबातील माजी महापौर महेश कोठे आणि त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांना प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी मिळाली आहे.
Mahesh Kothe-Devendra Kothe
Mahesh Kothe-Devendra KotheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 October : सोलापूरच्या इतिहासात विधानसभा निवडणूक विशेष ठरणार असून कोठे कुटुंबातील माजी महापौर महेश कोठे आणि त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांना प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महेश कोठे यांना सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून, तर भारतीय जनता पक्षाने देवेंद्र कोठे यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, त्यामुळे काका पुतण्याला आमदार होण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्याच यादीत माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांना उमेदवारी जाहीर झाली हेाती. कोठे यांच्या उमेदवारीचे संकेत खुद्द थोरल्या पवारांनी अडीच वर्षांपूर्वीचे दिले होते. आमदारकीचे गणित समोर ठेवूनच महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते सोलापूर शहर उत्तरचे प्रमुख दावेदार होते.

महेश कोठे यांचा सामना सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून (Solapur City North Constituency) माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी होणार आहे. देशमुख हे गेली चार टर्म या मतदारसंंघातून निवडून येत आहेत. देशमुख यांना महेश कोठे यांनी २००९ मध्ये तुल्यबळ लढत दिली होती. त्या निवडणुकीत माजी महापौर मनोहर सपाटे यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली होती, त्यांनी १४ हजार ६२५ मते घेतली होती, तर काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या कोठे यांना अवघ्या दहा हजार मतांनी पराभूत व्हावे लागले होते.

कोठे यांना आता आमदारकीची संधी मिळाली असून मतदारसंघातील विजयाची गणिते ते कशी मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कोठे यांनी शहर उत्तर बरोबरच सोलापूर शहर मध्य मतदासंघातूनही दोन वेळा निवडणूक लढवली होती. त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर, तर २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही वेळा त्यांना अपयश आले होते.

Mahesh Kothe-Devendra Kothe
BJP Candidate : आवताडेंना दुसऱ्यांदा संधी; ‘सोलापूर मध्य’मधून कट्टर हिंदुत्ववादी चेहऱ्याला पसंती!

दरम्यान, महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांनी आपली वाट स्वतंत्रपणे निवडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपत प्रवेश करताच लोकसभा निवडणुकीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत केलेल्या भाषणाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तीच प्रतिमा देवेंद्र कोठे यांना फायदेशीर ठरल्याचे मानले जात आहे.

फडणवीसांवरील श्रद्धा ठरली महत्वाची

देवेंद्र कोठे यांच्यासोबत सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून माजी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवारही इच्छुक होते. मात्र, त्यांनी देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देत निवडणुकीतून माघार घेतली होती. थेट फडणवीसांच्या गुडबुक असलेल्या देवेंद्र यांना अवघ्या काही महिन्यांत थेट आमदारकीची संधी मिळाली आहे.

Mahesh Kothe-Devendra Kothe
Solapur Politic's : सांगलीप्रमाणे ‘सोलापूर दक्षिण’मध्ये धाडस कराल तर अवघड जाईल; शिवसेनेचा काँग्रेसला धमकीवजा इशारा

कोठे काका-पुतणे विधानसभेत दिसणार?

राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष आहे. पण देवेंद्र कोठे यांनी काका महेश कोठे यांच्यापासून फारकत घेत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता कोठे काका पुतण्याला एकाच वेळी आमदारकीची संधी उपलब्ध झाली आहे. दोन पिढ्या राजकारणात घालून आमदारकीचा तिलक कोठे परिवाराच्या कपाळी लागला नव्हता, ती संधी आता त्यांना आली आहे. काका पुतणे दोघेही आता विधानसभेत दिसणार का?, असा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com