MLC Election : स्वीकृत सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा चेंडू विभागीय आयुक्तांच्या कोर्टात; निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष, सोलापुरात 616 जण मतदान

Nominated Member Voting Issue : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत १८ जूनला मतदान होणार असून स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
MLC Election
MLC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 May : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद सदस्य निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 616 मतदार असून विधान परिषद निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करता मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे.

दरम्यान, स्वीकृत सदस्यांना मतदानाचा हक्क आहे की नाही, याबाबत विभागीय अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविले आहे, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले, त्यामुळे आता स्वीकृत सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता येणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात विधान परिषदेसाठी सहा मतदान केंद्रांवर मतदान होणार असून मतमोजणी ही २२ जून रोजी नियोजन भवनात होणार आहे. या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीचे सभापती आणि १७ नगरपालिका आणि नगरपंचायत या संस्थांचे सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे निधी वाटप, नवीन घोषणा, पोस्टर बॅनर आणि प्रचार साहित्यांवर निर्बंध असणार आहेत. निवडणूक पारदर्शक होण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांत कळीचा मुद्दा म्हणजे स्वीकृत सदस्यांना विधान परिषदेत मतदान करता येणार का हा आहे.

MLC Election
MLC Election: विधानपरिषदेसाठी आता स्वीकृत नगरसेवकांना मिळणार मतदानाचा अधिकार? मतदार याद्यांबाबत अद्याप संभ्रम

महापालिकेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची अद्याप निवड करण्यात आलेली नाही. तसेच नगरपालिकांमध्येही काही ठिकाणी नियुक्त्या झाल्या आहेत, तर काही ठिकाणी अद्याप प्रलंबित आहेत, त्यामुळे स्वीकृत सदस्यांबाबत काय भूमिका घ्यायची, याबाबतचे मार्गदर्शन विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मागितले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी 616 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती तसेच सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत तपासणीसाठी उपलब्ध आहे.

MLC Election
NCP SP Strategy : पवारांचे शिलेदार कऱ्हाडमध्ये भाजपचा डाव उधळणार? : ‘कृष्णा’च्या निमित्ताने पाच तालुक्यांंत पडद्याआड जोरदार हालचाली

मतदारयादीतील नावाबाबत किंवा समावेशाबाबत कोणताही आक्षेप असल्यास तो 27 मे पूर्वी फॉर्म क्रमांक 17, 7 किंवा 8 मध्ये नोंदवून तो जिल्हाधिकारी कार्यालय, सहायक मतदार नोंदणी अधिकारी (निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर) यांच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com