
Solapur, 09 May : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी मोठे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने दिली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार वर्षांपूर्वी हॉस्पिटलची 50 टक्के मालकी ही सून डॉ. शोनाली आणि मुलगा डॉ. अश्विन यांच्या नावे केली हेाती. पण, गृहकलहामुळे व्यथित झालेल्या डॉ. वळसंगकर यांनी दोन महिन्यांपूर्वीच हॉस्पिटलचे सर्व अधिकार हे पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांच्याकडे कागदोपत्री सोपवले होते. त्यानंतरच डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या निकटवर्तीय प्रतिष्ठीत व्यक्तीने दिली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar ) यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे डॉ. शोनाली यांना आत्महत्येच्या घटनेनंतर अवघ्या तीनच दिवसांत घर सोडावे लागले. हॉस्पिटलच्या कामातूनही डॉ. शोनाली यांना दूर ठेवण्यात आलेले आहे. डॉ. उमा वळसंगकर यांच्याकडे आता रुग्णालयाची संपूर्ण धुरा आहे. आता डॉ. शोनाली यांना परत रुग्णालयाच्या कामकाजात सामावून घेतले जाईल की नाही?, हे सांगणे कठीण आहे.
त्यांनी सांगितले की, कौटुंबीक कलहामुळे डॉ. शिरीष वळसंगकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून डिस्टर्ब होते. वळसंगकर हॉस्पिटलमध्ये (Hospital) नातेवाईकांकडून होणाऱ्या गळचेपीमुळे त्यांनी वाडिया रुग्णालयात पूर्णवेळ सेवा बजावण्याची तयारी केली होती. त्यातूनच त्यांनी वाडिया रुग्णालयासाठी लागणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू केले होते.
डॉ. वळसंगकर यांनी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर वाडिया हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरवले होते. आत्महत्येच्या आठ दिवस अगोदर ते वाडिया हॉस्पिटलमध्ये आले होते, तेव्हा डॉक्टरांचा चेहरा पडलेला होता. त्यामागचे कारण त्यांनी सून असल्याचे सांगितले होते. तेव्हा ‘सून डॉ शोनाली हिला मी बोलू का,’ अशीही विचारणा केली होती, त्या वेळी डॉक्टरांनी 'मुलगा डॉ अश्विन यातून काहीतरी मार्ग काढेल', अशी अपेक्षाही बोलून दाखवली होती.
डॉ. शिरीष वळसंगकर हे सतत ‘डिप्रेशन’मध्ये होते. दिवसभर ते केवळ चहा आणि सिगारेटवरच असायचे. त्यांचे ‘डिप्रेशन’ किती वाढले होते, याबाबतची कल्पनाच आम्हाला आली नाही, असेही डॉक्टरांच्या निकटवर्तीय असलेल्या जवळच्या व्यक्तीने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.