
Solapur, 08 May : सोलापुरातील विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला 20 दिवस उलटून गेले आहेत. मात्र, पोलिस अजूनही ठोस निष्कर्षापर्यंत पोचू शकलेले नाहीत. वळसंगकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या अटकेशिवाय पोलिसांना अजूनही हाती काही लागल्याचे दिसत नाही. या प्रकरणी पोलिस कोणतीही माहिती माध्यमांना देत नाहीत, त्यामुळे प्रकरणाची चौकशी नेमकी कुठंपर्यंत पोचली आहे, हे समजू शकत नाहीत, त्यावर आता खुद्द गृहराज्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांकडून माध्यमांना माहिती दिली जात नाही, ’ अशी तक्रार गृहराज्य मंत्री कदम यांच्याकडे पत्रकारांनी केली होती. त्या वेळी गृहराज्यमंत्री कदम यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे कान टोचताना माहिती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
डॉ. शिरीष वळसगंकर (Dr. shirish Valsangkar) यांच्या आत्महत्या प्रकरणात माध्यमांची कोणताही गळचेपी होणार नाही, याची यापुढे दक्षता घेण्यात येईल. या आत्महत्या प्रकरणातील गोपनीय माहिती सोडून इतर सर्व माहिती माध्यमांना देण्यात यावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री कदम यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या, त्यामुळे डॉ वळसंगकर यांच्या प्रकरणातील सर्व माहिती आता माध्यमाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. वळसंगकर यांची सून डॉ. शोनाली आणि डॉ. दिलीप जोशी यांनी विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांच्या विरोधात पोलिस ठण्यात एक निवेदन दिले आहे. मात्र, ते पत्र डॉ. शोनाली आणि डॉ. जोशी यांनी खरं दिलं आहे की त्या पत्राच्या माध्यमातून माध्यमांवर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, याबाबतही मंत्री कदम यांनी भाष्य केल आहे. या प्रकरणाचीही सखोल करण्यात यावी, असा आदेश गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी डॉ शोनाली वळसंगकर आणि त्यांचे वडिल डॉ दिलीप जोशी यांनी माध्यमांमधून येणाऱ्या बातम्यासंदर्भात एक निवेदन दिले होते. ते निवदेन पोलिसांनी तातडीने व्हायरल केले होते. मात्र, डॉ. शोनाली यांचे ते निवेदन व्हायरल करणारे पोलिस अधिकारी तपासाबाबत माध्यमांना सखोल चौकशी सुरू आहे, एवढंच सांगत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त होत हाती. त्यावर आता खुद्द गृहराज्यमंत्र्यांनीच आदेश दिले आहेत.
दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली मनीषा मुसळे माने हिची न्यायालयीन कोठडी येत्या शुक्रवारी (ता. 09 मे) संपत आहे. गुन्ह्याचा तपास सुरू केल्यापासून 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करावे लागते. पण, तपास सुरू होऊन वीस दिवस होऊनही पोलिस ठोस कारणापर्यंत पोचू शकलेले नाहीत, त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत संशयित आरोपीला जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवगिरे यांनीही जामिनीसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे 09 तारखेला पोलिसांची कसोटी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.