Sawant Family : सावंत कुटुंबीयांत गृहकलह?; शिवाजीरावांच्या कार्यक्रमातून तानाजीरावांचे फोटो गायब!

Solapur Shivsena Politics : एरवी शिवसेना आणि सावंत कुटुंबीयांचा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यावर तानाजी सावंत यांचा फोटो कायम असायचा. मात्र, आता सावंत कुटुंबीयांत उभी फूट पडल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे.
Eknath Shinde-Shivaji Sawant-Tanaji Sawant
Eknath Shinde-Shivaji Sawant-Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 April : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सावंत कुटुंबीयांतील गृहकलह चव्हाट्यावर आला आहे. शिंदे यांचा दौरा, माढ्यातील मेळावा यानिमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मंत्री तथा सावंत कुटुंबीयांतील प्रमुख असलेले तानाजी सावंत यांना स्थान नसल्याचे दिसून येत आहे. पक्षापाठोपाठ कुटुंबातही तानाजी सावंत हे एकटे पडले आहेत काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांच्या पुढाकाराने माढा येथे शिवमेळावा आणि राजवी ऑईल मिलचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे हे आज माढ्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यानिमित्ताने मेळावा आणि ऑईल मिल भूमिपूजनाचे प्लेक्स आणि जाहिरातबाजी सगळीकडे करण्यात आली आहे. त्या जाहिरातीत आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवाजीराव सावंत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचाही फोटो आहे. मात्र, घरातील माजी मंत्री असलेल्या आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा जाहिराती आणि कार्यक्रमाच्या फ्लेक्सवरून गायब आहेत. एरवी शिवसेना आणि सावंत कुटुंबीयांचा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यावर तानाजी सावंत यांचा फोटो कायम असायचा. मात्र, आता सावंत कुटुंबीयांत उभी फूट पडल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे.

Eknath Shinde-Shivaji Sawant-Tanaji Sawant
Eknath Shinde Solapur Tour : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा रद्द; सावंत कुटुंबातील ‘हे’ कारण चर्चेत....

तानाजी सावंत यांना महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपद मिळू शकलेले नाही. तसेच, शिवसेनेच्या पक्षीय कार्यक्रमात तानाजी सावंत यांना डावलण्यात येत असल्याची चर्चा आहे. एकीकडे पक्षीय पातळीवर संघर्ष करणारे तानाजी सावंत यांना आता कौटुंबीक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेत असणाऱ्या स्वतःच्या भावाकडूनच सावंतांना डावलले जात असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी तानाजी सावंत हे शांत होते. मात्र, शिवाजीराव सावंत यांनी पुतण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. कोण अनिल सावंत, असा सवालही त्यांनी विचारला होता. तत्पूर्वी अनिल सावंत यांनीही कुटुंबांसंदर्भात भाष्य केले होते.

मंत्रिपदापासून दूर राहावे लागलेल्या तानाजी सावंत यांचे ग्रहमान सध्या फिरल्याचे दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांची कोणी दखल घेतली नव्हती. नीलम गोऱ्हे व इतर नेत्यांच्या उपस्थित शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला होता, त्या मेळाव्यालाही सावंतांना बोलविण्यात आले नव्हते.

Eknath Shinde-Shivaji Sawant-Tanaji Sawant
Pawar Vs Thopte : संग्राम थोपटेंनी पक्ष बदलला, अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, ' मी काय...'

एकाच पक्षात असलेल्या शिवाजी सावंत आणि तानाजी सावंत या सावंत कुटुंबातील वादामुळे तरी एकनाथ शिंदे यांनी आपला सोलापूर दौरा रद्द केलेला नाही, अशीही चर्चा आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com