
Solapur, 20 April : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्याच हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकरी असलेली मनीषा मुसळे-माने हिला सोलापूरच्या सत्र आणि दिवाणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुसळे-मानेच्या विरोधात डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी महिला मनीषा मुसळे-माने हिच्या वकिलाने गंभीर आरोप केला आहे. ‘या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ती बाहेर येऊ नये, यासाठी खोटी केस मनीषा मुसळे माने हिच्यावर करण्यात आली आहे,’ असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी शुक्रवारी (ता. 18 एप्रिल) राहत्या घरी पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर शनिवारी (ता. 19 एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास मनीषा मुसळे-माने हिला पोलिसांनी अटक केली होती. तिला आज सोलापूरच्या सत्र आणि दिवाणी न्यायालयात उभे करण्यात आले होते. त्या वेळी मनीषा मुसळे-माने हिच्या वतीने ॲड. प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद मांडला.
ॲड. नवगिरे म्हणाले, मनीषा मुसळे माने हिने 17 एप्रिल रोजी डॉ. वळसंगकर यांना मेल केला हेाता. त्यात तिने हॉस्पिटलमध्ये (Hospital) माझे अधिकार कमी केले जात आहेत. काही व्यक्तींचे ऐकून त्याच्यावर आरोप केले जात आहेत. तिचा पगार कापला जात आहे, त्यामुळे मी आत्महत्या करणार आहे. त्यात डॉ. वळसंगकर यांचे नाव घेणार आहे, असे तिने म्हटले होते.
दुसऱ्या दिवशी डॉ. वळसंगकर यांनी मनीषा मुसळे-माने हिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी तिने तसा मेल करणे चूक झाली; म्हणून माफी मागितली होती. संबंधित पत्र फाडून टाकले होते. त्यानंतर त्याच रात्री डॉक्टरांनी राहत्या घरात आत्महत्या केली. एक महिला एवढी त्रास देणारी होती, तर त्याच दिवशी तिला बोलावण्यात आले नसते. आमचे म्हणणे आहे की, या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, ती समोर येऊ नये; म्हणून मनीषा मुसळे-माने हिला फसवण्यात आले आहे, असा युक्तिवाद आरोपीचे वकिल नवगिरे यांनी केला आहे.
डॉक्टरांच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. चिठ्ठी जप्त झाली आहे. हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासायला पाठवायचे आहेत, असे पोलिसांनी कोर्टासमोर सांगितले आहेत. प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ असणारे डॉ. वळसंगकर अशा कारणांमुळे आत्महत्या करणे शक्य नाही. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ती बाहेर येऊ नये, यासाठी खोटी केस मनीषा मुसळे माने हिच्यावर करण्यात आली आहे, असा युक्तिवाद ॲड. प्रशांत नवगिरे यांनी केला आहे.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने मनीष मुसळे माने हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जेव्हा कोठडी संपेल, तेव्हा जामीनासाठी अर्ज करण्यात येईल. मनीषा मुसळे माने हिच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही. आरोप एवढाच आहे की, तिने डॉक्टरांना मेल केला, त्यात तिने डॉक्टरांवर आरोप केले की, माझी पगार कपात करू नका. पण तिने माफी मागितली होती. तिने फक्त मेल केला आहे, बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत. पण मेल केल्यामुळे डॉक्टर व्यथीत झाले होते, असे ॲड नवगिरे यांनी युक्तिवादात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.