Loksabha Election : लोकसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे मोठे पाऊल; ‘या’ नेत्यांची समिती घेणार निर्णय

Mahavikas Aghadi News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असतानाही निवडणुकीच्या रणनीतीवर काम केले जात आहे.
Mahavikas Aghadi Leader
Mahavikas Aghadi LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग येताना दिसत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) आणि इंडिया आघाडीतील पक्षांकडून बैठका, शिबिरे घेतली जात आहेत. लोकसभेतील जागा वाटप निश्चित करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीने समिती स्थापन केली आहे. (Committee constituted by Mahavikas Aghadi for allotment of Lok Sabha seats)

महाविकास आघाडीची ही समिती जागावाटपावर चर्चा करून त्याचा मसुदा वरिष्ठ नेत्यांना सादर करणार आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रत्येकी तीन नेते असणार आहेत. ही समितीची महाविकास आघाडीची जागावाटप अंतिम करणार आहे.

Mahavikas Aghadi Leader
Nanded Hospital News: मोठी बातमी! नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दरम्यान, महाविकास आघाडीकडून स्थापन करण्यात येणाऱ्या निवडणूक टीममध्ये काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील आणि आमदार नसीम खान यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख या तिघांचा समावेश आहे. ही समिती चर्चा करून कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा सोडायच्या याचा निर्णय घेणार आहे. राज्यातील ४८ जागांवर ही समिती चर्चा करणार असून, जिंकून येण्याचा निकष लावूनच महाविकास आघाडीतील जागा कोणाला सोडायची, याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या कामाला वेग दिला आहे. त्यासाठी संघटना मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यातूनच गेल्या आठ ते दहा दिवसांतच मुंबईत पक्षाच्या कार्यकारिणीची दोन वेळा बैठक झाली आहे. त्या बैठकीतच भाजपच राज्यात ‘बॉस’ आहे, असे विधान केले होते.

Mahavikas Aghadi Leader
Pankaja Munde Politics : पंकजा मुंडे म्हणाल्या, पैसे नको, आशीर्वाद द्या...

दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असतानाही निवडणुकीच्या रणनीतीवर काम केले जात आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे रणनीतीवर काम करत आहेत.

Mahavikas Aghadi Leader
Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी पूजेचा मान उपमुख्यमंत्री फडणवीस, की अजितदादांना ? मंदिर समितीचा 'हा' निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com