Satara : गिरीश बापट यांच्या निधनामुळे शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

Shivendraraje Bhosale वाढदिवस साधेपणाने केला जाणार असून कोणीही पुष्पगुच्छ अथवा केक कापणे, फटाके वाजवू नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale sarkarnama

Shivendranraje Bhosale News : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस उद्या (गुरुवार, ता. ३०) असून भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री, खासदार गिरीश बापट Girish Bapat यांचे नुकतेच निधन झाल्याने वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

वाढदिवस एकदम साधेपणाने साजरा केला जाणार असून कोणीही पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू देऊ नये, केक कापणे, फटाके वाजवू नये अथवा इतर अन्य कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी कै. गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उद्या (३० मार्च) रोजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यानिमित्त गेल्या दोन- तीन दिवसांपासून सातारा- जावली मतदारसंघात विविध कार्यक्रम चालू होते. दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री, विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच आले.

MLA Shivendraraje Bhosale
Satara Market Committee Election: राष्ट्रवादी विरूद्ध भाजप, शिवसेनेचे स्थानिक गट झुंजणार

हे वृत्त समजताच शिवेंद्रसिंहराजेंनी वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करीत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. गुरुवारी वाढदिवसानिमित्त केवळ एहसास मतिमंद मुलांची शाळा, रिमांड होम येथे भेट दिली जाणार आहे. कोणीही पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू देऊ नये, केक कापू नये, फटाके वाजवू नये.

MLA Shivendraraje Bhosale
Girish Bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

अथवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेला केले आहे. वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला जाणार असून जनता, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी केवळ शुभेच्छा द्याव्यात, याव्यतिरिक्त कोणताही कार्यक्रम घेऊ नये, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

MLA Shivendraraje Bhosale
Ankush Kakade On Girish Bapat: पण नियतीला ते मान्य नव्हतं..; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे अक्षरश: रडू लागले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com