Shirdi Sai Sansthan : शिर्डीच्या साई मंदिरातील द्वारकामाई सभामंडप दर्शनासाठी आता रात्रभर खुला !

Shirdi News : शिर्डी संस्थानने दर्शन वेळेत केले बदल
Shri Dwarakamai Sabhamandap
Shri Dwarakamai SabhamandapSarkarmana
Published on: 
Updated on: 

Ahmednagar News : श्री क्षेत्र शिर्डी येथे देश-विदेशातून लाखो भाविक श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येतात. या ठिकाणी आल्‍यानंतर भाविक श्रींच्‍या समाधीसह व्‍द्वारकामाई, चावडी व गुरुस्‍थान आदी ठिकाणी प्राधान्‍याने दर्शन घेतात. मात्र येथे होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होते. यावर आता साई संस्थानने पर्याय शोधला आहे. येथील द्वारकामाई मंदिरातील दर्शनाची वेळ वाढविली आहे. त्यानुसार आता द्वारकामाई सभामंडप भाविकांसाठी रात्रभर खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Shri Dwarakamai Sabhamandap
Ahmednagar News: राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार?; नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावरही काँग्रेसचा दावा

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या (Shirdi) वतीने श्री व्‍दारकामाई मंदिराचे दर्शनाच्‍या वेळेत बदल करण्‍यात आला आहे. त्यानुसार श्री व्‍दारकामाई सभामंडप साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवार (ता. १ जून)पासून करण्यात आली आहे. याबाबत संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी माहिती दिली.

शिर्डीचे साईबाबा मंदिर (Sai Baba Temple) हे सर्वधर्मीय भक्तांचे आस्थेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. साईबाबा समाधी मंदिर, द्वारकामाई मंदिर, गुरुस्थान या ठिकाणी ते प्राधान्याने दर्शन घेतात. यावेळी त्यांना दर्शनासाठी तासंतास उभे रहावे लागते. आता शिर्डी संस्थान व्यवस्थेच्या वतीने द्वारकामाई सभामंडप भाविकांसाठी रात्रभर खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

Shri Dwarakamai Sabhamandap
Pune News : अजितदादा समर्थक आमदार टिंगरेंनी काढला मध्यममार्ग; होर्डींगवर स्वराज्यरक्षक अन् धर्मवीरही...

साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थांकडून व्‍दारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी वारंवार होत होती. त्‍याअनुषंगाने संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या सभेत श्री द्वारकामाई सभामंडप साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍याबाबतचा निर्णय घेण्‍यात आला. आता श्री व्‍दारकामाईतील गाभारा दर्शन पहाटे ५ ते रात्री साडेनऊ (पूर्वीप्रमाणे) यावेळेत सुरु राहील. तर श्री व्‍दारकामाई सभामंडप साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे. या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन ही श्री साईबाबा संस्‍थानचे जाधव यांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.