

MLA Sunil Tingare News : पुण्यातील वडगाव शेरी (Vadgaon Sheri) या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार सुनिल टिंगरे यांच्या आमदार निधीतून साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचा अनावरण विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज पार पडले.
मात्र या शिल्पाच्या अनावरण कार्यक्रम पत्रिकेवरसंभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर अशा दोन्ही उपाधींनी करण्यात आला. यामुळे आमदार टिंगरेंनी एकीकडे आपल्या पक्षाची भूमिका सांभाळताना, विरोधकांचा विरोध नको म्हणून धर्मवीर असाही उल्लेख करत त्यांनी मध्यम मार्ग साधल्याची चर्चा होत आहे.
एक वर्षापूर्वी पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनातील अखेरच्या भाषणात वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ नामकरणावर ही भूमिका मांडली होती. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही, तर स्वराज्यरक्षक आहेत, असे पवार म्हणाले होते. यावर भाजप आणि शिंदे गटासोबतच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता.
"छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा," असे अजित पवार म्हणाले होते.
मात्र राज्यात याविषयी वाद वाढून आल्यानंतर अजित पवारांनी आपली भूमिका काही अंशी मवाळ करत म्हणाले की, ज्यांना संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर करायचा आहे त्यांनी तो करा आणि ज्यांना स्वराज्यरक्षक असा उल्लेख करायचा आहे तसा तो त्यांनी करा, अशी भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केली होती.
आज वडगावशेरी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या अनावरण कार्यक्रमात धर्मवीर की स्वराज्यरक्षक असा संभाव्य वाद होऊ नये म्हणून आमदार सुनिल टिंगरेनी धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक अशा दोन्ही विशेषणांचा उल्लेख करत मध्यम मार्ग साधल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.