Hasan Mushrif : चौकशीचा ससेमिरा; हसन मुश्रीफांचा वाढदिवस 'ईडी'च्या कार्यालयातच

ED News : आजपर्यंत तीनवेळा मुश्रीफांनी लावली 'ईडी'च्या कार्यालयात हजेरी
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

ED and Mushrif : साखर कारखान्यातील भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना 'ईडी'ने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार हसन मुश्रीफांनी 'ईडी' कार्यालयात हजेरी लावली. तेथे त्यांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. आज मुश्रीफांचा वाढदिवस होता. चौकशीतच आठ तास गेल्याने त्यांचा वाढदिवस दिवस ईडी कार्यालयातच गेला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल आहेत. त्या प्रकरणी 'ईडी' तपास करत आहे. ईडीने मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर त्यांना 'ईडी'च्या मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहाण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते. मुश्रीफांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मुश्रीफ हे तीनवेळा मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले आहेत. दरम्यान आज त्यांचा वाढदिवस होता. मात्र समन्सनुसार ते मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहिले. तेथे त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानतंर ते कार्यालयातून बाहेर पडले.

Hasan Mushrif
Harshvardhan Jadhav : उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड भावुक झालो; पण निरोप आला, ‘नॉट इंटरेस्टेड...’ : हर्षवर्धन जाधवांनी सांगितली आतली गोष्ट

दरम्यान, सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार आणखी २५ शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे डीवायएसपी श्रीकांत पिंगळे यांच्याकडे दाखल केली आहे. याआधी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात याच प्रकारची तक्रार कागलचे विवेक कुलकर्णी व इतर शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे.

Hasan Mushrif
Rahul Gandhi : न्यायालयाचा निर्णय कायद्याप्रमाणे; पण लोकसभाध्यक्षांनी नैतिकता पाळली नाही, सरोदेंनी स्पष्ट सांगितलं

तत्पुर्वी, 'ईडी'कडून गेल्या दोन महिन्यात मुश्रीफ यांच्या संपत्तीवर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. त्यांना 'ईडी'ने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. मागील सहा ते सात महिन्यांपासून त्यांच्यावर तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com