Eknath Shinde Satara Tour : सातारा दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; पृथ्वीराजबाबांना धक्का देत काँग्रेसच्या तीन नेत्यांना गळाला लावले

Congress Leader Will Join Shivsena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दौऱ्यात काँग्रेसच्या तीन स्थानिक नेत्यांना आपल्या गळाला लावले असून, ते लवकरच मुंबईत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Eknath Shinde-Prithviraj Chavan
Eknath Shinde-Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on
  1. एकनाथ शिंदेंची कराड दक्षिणवर नजर:
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दौऱ्यात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघात तीन स्थानिक काँग्रेस नेत्यांना शिवसेनेत येण्यासाठी तयार केले आहे.

  2. शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार:
    साताऱ्यातील बैठकीत शिंदे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देत काँग्रेसमधील प्रभावशाली नेत्यांशी संपर्क साधला आहे.

  3. पक्षांतरांच्या हालचालींना वेग:
    काँग्रेस नेते शिवसेनेत येत असताना, शिंदे गटातील काही नगरसेवक मात्र भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Satara, 16 October : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का देण्याची संपूर्ण तयारी केली आहे. कराड दक्षिणमधील काँग्रेसच्या तीन स्थानिक नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहे. काँग्रेसच्या या तीन नेत्यांशी शिंदे यांनी चर्चा केली असून त्यांचा लवकरच मुंबईत शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे शिवसेना पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी बैठक आणि मेळावा घेतला. सातारा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंत ऊर्फ बंडानाना जगताप, काले येथील पहिलवान नाना पाटील आणि शिवाजीराव मोहिते या कराड दक्षिणमधील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यासाठी प्रयत्न केले. कराड दक्षिणमधील हे तीन स्थानिक नेते लवकरच शिवधनुष्य हाती घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना वाढीसाठी एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिंदे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावलेले असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या एका माजी नगरसेविकेसह आणि तीन नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे जिल्ह्यात पक्षांतराचे वारे जोरदारपणे वाहताना दिसून येत आहेत.

Eknath Shinde-Prithviraj Chavan
PCMC News : शेखर सिंहाच्या काळात महापालिकेवर 22 हजार कोटींचे कर्ज? पडताळणी होणार, अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

एकनाथ शिंदे यांनी कराड दक्षिण वर लक्ष्य केंद्रित करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का देण्याची जोरदार तयारी केल्याचे भेटीगाठीतून दिसून येत आहे. निवडणूक जवळ येईल, तसतसे पक्षांतरे वेगाने होताना दिसून येतील.

मनोहर शिंदेंसाठी प्रयत्नशील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयवंत जगताप यांच्यासह तिघांशी चर्चा केल्यानंतर मलकापूरचे माजी ‌उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांचीही चौकशी केली. मनोहर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर शिंदे यांचे काम चांगले असून शिवसेना त्यांच्या संपर्कात आहे, त्यामुळे मनोहर शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार का, असा सवाल चर्चेला जात आहे.

पक्षवाढीसाठी प्रयत्नशील : यादव

शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव म्हणाले, शिवसेना पक्षवाढीसाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्या करण्यात येत आहेत. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर चांगलं काम असणाऱ्या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे, त्यातूनच काल काँग्रेसच्या तीन नेत्यांशी एकनाथ शिंदे यांची भेट घालून देण्यात आली आहे.

Eknath Shinde-Prithviraj Chavan
Prakash Londhe : नाशिकमध्ये यूपी पॅटर्न, लोंढे टोळीचा कारभार जिथून चालायचा 'त्या' इमारतीवरच चालवला 'बुलडोजर'

1. एकनाथ शिंदेंनी कोणत्या काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला आहे?
जयवंत (बंडानाना) जगताप, नाना पाटील आणि शिवाजीराव मोहिते या तिघांशी चर्चा झाली आहे.

2. या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश कधी होणार आहे?
त्यांचा लवकरच मुंबईत अधिकृत प्रवेश होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

3. एकनाथ शिंदे यांनी कोणावर राजकीय लक्ष केंद्रित केले आहे?
कराड दक्षिणमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटावर.

4. या दौऱ्याचा उद्देश काय होता?
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीसाठी प्रभावशाली नेत्यांशी संपर्क साधणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com