Eknath Shinde News: मुख्यमंत्री शिंदेंची वातावरणनिर्मिती; पण मदार भाजप-राष्ट्रवादीवर

ShivSainiks achieve the convention : अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी काय मिळवले
BJP, NCP, Shivsena, Congress
BJP, NCP, Shivsena, Congress Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर युतीत सहभागी होऊन एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यांच्यासोबत असणाऱ्या जवळपास 40 आमदारांना या पदामुळे बळ मिळाले. कोल्हापुरात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या माध्यमातून शिवसैनिकांना बळ देण्याचे काम केले. या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी काय मिळवले? असा सवाल उपस्थित होतो. शिवाय पक्षवाढीची जबाबदारी कशी पार पाडणार हादेखील सवाल उपस्थित होत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरणनिर्मितीचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मात्र, राज्यातील शिवसैनिकांना चार्ज करण्याचे काम शिंदे यांनी केले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन खासदारांचे काम आपल्यापुरतेच राहिले आहे. शिवाय विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनीदेखील आपल्या मतदारसंघातच त्याचा प्रभाव वाढवला आहे. केवळ आमदार आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या ना त्या कारणाने शिवसेना शिंदे गट कमालीचा बांधून ठेवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP, NCP, Shivsena, Congress
Thane Politics : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच केंद्र सरकारकडून भाजपला पुरविण्यात आली रसद

2014 च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर, राधानगरी, करवीर, शिरोळ, हातकणंगले आणि शाहूवाडी मतदारसंघांत पक्षाने हवा केली असली तरी या सहा मतदारसंघात सध्या फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीवरच त्यांच्या शिवसेनेच्या विजयाची मदार राहणार निश्चित आहे. 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील चित्र बदलत गेले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही खासदार मिळवले असले तरी विधानसभा निवडणुकीत केवळ एकाच आमदारावर समाधान मानावे लागले.

शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागर,आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विकास निधी खेचून आणत आगामी विधानसभेची पायाभरणी सुरू केली, तर दुसरीकडे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दोन दिवसांपूर्वी भूमिका घेऊन शिंदे यांच्या सोबत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित बळ मिळेल असे वाटत आहे. खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी कागल व हातकणंगले वगळता इतर मतदारसंघांत पक्ष बळकटीसाठी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात भगवे वातावरण करण्याचा प्रयत्न केला असला तरी हे वातावरण मतदान यंत्रापर्यंत पोहाेचेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेची भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसवरच मदार राहणार हे निश्चित आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

BJP, NCP, Shivsena, Congress
Maratha Resevation Bill : जरांगेंना जी शंका तीच उद्धव ठाकरेंना; म्हणाले,'मराठा समाजाने...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com