Shivsena Politics: कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला 'अच्छे दिन',इच्छुकांच्या रांगा; पण 'ही' असणार टांगती तलवार

Eknath Shinde Shivsena Politics : सध्या शिवसेनेत दोन पक्ष असल्याने त्याचा परिणाम कोल्हापुरातही आहे. कोल्हापूर शहरात सध्या शिवसेनेला चांगले दिवस आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच सुरू असलेल्या शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे.
Eknath Shinde ShivSena
Eknath Shinde ShivSenaSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर शहर व आत्ताचा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा दोन वेळेचा अपवाद वगळता शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेकवेळा शिवसेनेचा आमदार असूनही कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकत नसल्याची खंत अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त करून दाखवली. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला कोल्हापुरात अच्छे दिन आले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुकांच्या रांगा शिवसेनेच्या दारासमोर लागल्या आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्ह्याचे समन्वय सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या नेतृत्वाखाली सध्या शिवसेनेत पक्षप्रवेशाची नांदी सुरू आहे. पण चांगले दिवस येत असताना पूर्वीप्रमाणे मानपान, श्रेयवाद आणि माझा तुझा वरून माशी शिंकत आहे.

यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेतील शिवसेनेची अवस्था पाहता पूर्वीपासूनच दोन गट कार्यरत होते. सध्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार व शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर त्यांच्यातील अंतर्गत वादाचा फायदा आजवर इतर पक्षातील नेते घेत आले. त्यामुळे शहरातील शिवसेना कधीच वाढली नाही.

सध्या शिवसेनेत दोन पक्ष असल्याने त्याचा परिणाम कोल्हापुरातही आहे. कोल्हापूर (Kolhapur) शहरात सध्या शिवसेनेला चांगले दिवस आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच सुरू असलेल्या शिवसेनेकडे आगामी इच्छुकांचा ओढा अधिक आहे.

Eknath Shinde ShivSena
Ranjan Taware's Defeat : ‘माळेगाव’चे माजी अध्यक्ष रंजन तावरेंचा धक्कादायक पराभव; अजितदादांच्या शिलेदारांनी बालेकिल्ल्यातच केले चितपट

शिवसेनेत अनेक इच्छुकांना आणण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 23 नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पण या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी दिसून आली.

वास्तविक पक्षासाठी एक दिलाने, एक मुखाने निर्णय घेणे अपेक्षित असताना काही नेत्यांकडून मात्र केवळ मानपान, श्रेय, आणि माझा तुझा वरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे. आकडेवाडीवरूनच आपली ताकद मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यातूनच सुरुवातीपासूनच पक्षप्रवेश करणाऱ्या काही इच्छुकांवर दबाव टाकला असल्याचे देखील चर्चा या पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान उपस्थित होती. तर काही इच्छुकांना पक्षप्रवेशापासून रोखण्याची देखील चर्चा मुंबईत जोरदार होती. यातील काही नेत्यांची भूमिका पक्षासाठी आपण सर्व काही पाठीवर टाकून पुढे गेलं पाहिजे हीच दिसून आली.

Eknath Shinde ShivSena
Malegaon Sugar Factory Election: अर्थमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी 500 कोटी रुपये कुठून देणार आहेत? ठाकरेंच्या पठ्ठ्यानं विषय तापवला

पण अजून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला तीन ते चार महिन्याचा अवधी आहे. अशावेळी कोल्हापूर शहरात मीच म्हणेल ती पूर्व दिशा, अशा पद्धतीचे राजकारण केल्यास त्याचे पाहिल्यासारखे शिवसेनेला दुष्परिणाम भोगण्यास वेळ लागणार नाही. शिवाय चा फायदा घेण्यास इतर पक्षातील लोक संधी सोडणार नाहीत, असे देखील चित्र निर्माण होऊ शकते.

'नाराजी नाट्यातून दोन बैठका...'

शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची देखील आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यातील अनेकांचा पक्षप्रवेश झा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com