Malegaon Sugar Factory Election: अर्थमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी 500 कोटी रुपये कुठून देणार आहेत? ठाकरेंच्या पठ्ठ्यानं विषय तापवला

Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखान्याच्या निकालाकडे बारामतीचंच नाही,तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. अजित पवारांनी पूर्ण ताकद पणाला लावत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
Ajit Pawar Uddhav Thackeray
Ajit Pawar Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माळेगाव साखर कारखान्याच्या निकालाकडे बारामतीचंच नाही,तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. अजित पवारांनी पूर्ण ताकद पणाला लावत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. आता या निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलची विजयाकडे वाटचाल सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवारांना अडचणीत आणणारा सवाल केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता.25) पत्रकार परिषदेत राज्यातील विविध मुद्दयांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी बारामती साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुनही उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचा पैसा तुम्ही वळवत आहात.मग निवडणुकीआधी माळेगाव कारखान्याला 500 कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.एका कारखान्याला जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे. मी 500 कोटी रुपये घेऊन येतो, मला मत द्या यावर कार्यवाही व्हायला पाहिजे.हा भ्रष्टाचार असून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना जाब विचारला पाहिजे.तसेच त्यांच्यावर कारवाई करायला हवी,असेही राऊतांनी म्हटलं.

संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार सुरू आहे, त्याची तुलना कुठल्याही जगातल्या घोटाळा संदर्भात होऊ शकत नाही. 19 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन झालं. आज त्या रस्त्याची अवस्था बघा. या ड्रीम प्रोजेक्टमध्ये 50% घोटाळा आहे.देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता असाही हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

Ajit Pawar Uddhav Thackeray
Satara Politic's : आमदार अतुल भोसलेंनी सांगितली महायुतीची निवडणूक स्ट्रॅटेजी; ‘जिथे महायुती शक्य नाही; तिथे मैत्रीपूर्ण लढती’

शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक विकत घेण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट झाला.आज या रस्त्याची अवस्था जाऊन पहा. आता हे लोक शक्तिपीठच्या मार्गावर लागले असून त्यासाठी वीस हजार कोटी मंजूर झाले. त्यातले किमान दहा हजार कोटी बाहेर येतील आणि हे दहा हजार कोटी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरले जातील हे मी तुम्हाला आता सांगतो. हे ड्रीम प्रोजेक्ट ठेकेदारांकडून हजारो कोटी रुपये भरण्यासाठी झालेले आहेत, असा आरोपही संजय राऊतांनी महायुती सरकारवर केला.

सगळ्यात आधी आपले किसे भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक ब्लॅक मनी मधून खरेदी विक्री सुरू करा, समृद्धी महामार्गासंदर्भात ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही, त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे,अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.

Ajit Pawar Uddhav Thackeray
Ajit Pawar: अजितदादांनी किरीट सोमय्यांना कडक शब्दांत दिली समज; म्हणाले,'मशिदीत जाऊ नये,अन्यथा...

संजय राऊतांनी यावेळी आता ठेकेदारांनी त्यांना मोठं कमिशन दाखवलं असेल,ही सगळ्यात मोठी कमिशन बाजी आहे. अजित पवार हे 500 कोटी माळेगाव साखर कारखान्याला देणार आहेत, ते कुठून आणणार आहात? त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री 20 दिवस गावात बसतात, काय चाललं आहे या राज्यात? फार कठीण अवस्था आहे. महाराष्ट्राची लूट चालली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com