Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांचा 'स्वबळाचा नारा'?, एकनाथ शिंदेंशीही घेतला पंगा; महत्वाचा नेता फोडला

Eknath Shinde Shivsena leader Join Rayat Kranti Sanghtna : भाजप विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आगामी स्थानिकबाबत मोठी घोषणा करताना भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अंगावर घेतलं आहे.
Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सांगलीत तर ऐन पावळ्यात राजकीय घाम निघत आहे. येथे भाजपने काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटलांचा प्रवेश निश्चित केला असतानाच भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याला फोडलं आहे. यामुळे दोस्तीत कुस्ती सुरू झाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शिवसेना नेत्याचा प्रवेशच करून घेतला नाही. तर भाजपलादेखील अंगावर घेतलं आहे. त्यांनी स्थानिकबाबत युती असेल तिथे युती आणि नसेल त्या ठिकाणी संघटना स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.

सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी केला प्रवेश. हा प्रवेश सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. भीमराव माने हे कवठेपिरान ग्रामपंचायतचे माजी सरपंच असून आदर्श सरपंच म्हणून देखील त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणूकनंतर भीमराव माने यांनी शिवसेना शिंदे पक्षाशी फारकत घेतली होती. अखेर सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत त्यांनी प्रवेश केला आहे.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी, रयत क्रांती संघटना आता स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले. तसेच युती असेल तिथे युती आणि नसेल त्या ठिकाणी संघटना स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचीही माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.

Sadabhau Khot
Sadabhau Khot News : आत्ताच्या मंत्र्यांचा तोरा लय, जहागीरदार समजतात! सदाभाऊंच्या निशाण्यावर कोण-कोण?

खोत म्हणाले, रयत क्रांती संघटनेची निर्मिती ही विस्थापित विरुद्ध प्रस्थापित व वाडा विरुद्ध गावगाडा यातून झाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेत केलेल्या प्रवेशामुळे सामान्य माणसाच्या लढ्याला एक नवं वळण, नवी दिशा मिळणार आहे.

गाव, जिल्हा परिषद पातळीवर काम न करता त्यांनी सामान्य जनतेचे राज्यव्यापी नेतृत्व करावे. रयत क्रांती संघटना गावातील अठरापगड जातीच्या लोकांना सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे, हे ध्येय घेऊन काम करत आहोत. रयत क्रांती संघटनेत प्रवेश केलेले भीमराव माने यांच्यासमवेत महाराष्ट्रातील कानाकोपरा पिंजून काढणार असल्याचेही खोत यांनी यावेळी सांगितले.

Sadabhau Khot
Sadabhau Khot : 'ओसाड गावची पाटीलकी? अन् ढेकळांचे पंचनामे' कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार भडकला? कोकाटेंना म्हणाला, 'संवेदनशील...'

रयत क्रांती संघटनेने नेहमी दूध, ऊस, कांद्याच्या दराबाबत आंदोलने केलीत. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले जाचक कायदे रद्द होण्यासाठी सरकारमध्ये असूनसुद्धा आंदोलने करीत आहोत. शेतकऱ्यांसाठी आणलेले तीन कृषी कायदे लागू करा, या भूमिकेवर रयत संघटना काम करणार आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका लढवणार असल्याचेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com