Devendra Fadnavis : शिंदे जम्मू काश्मीरला गेले; फडणवीस का गेले नाहीत? जयकुमार गोरेंनी सांगितले कारण....

Pahalgam Terror Attack News : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत, ते केले आहेत. फडणवीसांनी गिरीश महाजन यांना जम्मू काश्मीरला पाठविले होते.
Eknath Shinde-Devendra Fadnavis-Jaykumar Gore
Eknath Shinde-Devendra Fadnavis-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 April : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक पर्यटक हे श्रीनगरमध्ये अडकून पडले होते, त्यांना आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः हे जम्मू काश्मीरला गेले हेाते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत, या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फडणवीसांच्या जम्मू काश्मीरला न जाण्याचे कारण सांगितले आहे.

दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करून तब्बल २८ जणांची हत्या केली होती, तर २२ जखमी झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक अडकून पडले होते. राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जम्मू काश्मीरला गेले होते. त्याठिकाणी जाऊन त्यांनी पर्यटकांना राज्यात परत आणले. त्यावरून राज्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. त्याबाबत सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले गोरे बोलत होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत, ते केले आहेत. फडणवीसांनी गिरीश महाजन यांना जम्मू काश्मीरला पाठविले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्याठिकाणी तळ ठोकून होते. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तेथील व्यवस्था आपल्या पाठीशी फिरवणं, योग्य नाही.

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Jaykumar Gore
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांच्या सुनेच्या नावे प्रॉपर्टीतील 50 टक्के शेअर्स; पण चौकशीत ‘ही’ महत्वपूर्ण बाब आली समोर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संपर्कात आहेत. ते स्वतः या सगळ्या प्रक्रियेत सक्रीय आहेत. सोलापूरसह संपूर्ण देशातील पर्यटक सुरक्षित आहेत. त्यांना आपल्या घरापर्यंत पोचविण्याची जबादारी सरकारने घेतली आहे. या घटनेचा निषेध तरच केला आहे. निषेध करून विषय संपणारा नाही. असले भ्याड कृत करणाऱ्यांचा संपूर्ण जगाने निषेध केलेला आहे, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

गोरे म्हणाले, अशा वेळी देशातील प्रत्येक नागरिक देशासोबत उभा असतो. युद्ध झालं तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान दिसणार नाही, अशी परिस्थिती होईल. युद्ध करणं, न करणं हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार त्याबाबत निर्णय घेईल. पण असं कोणतंही कृत भारत खपवून घेणार नाही. त्याबाबत जनतेने निश्चिंत राहावे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Jaykumar Gore
Dr. Shirish Valsangkar : अवघ्या दोन मिनिटांत संपवली सुनावणी; पोलिसांनी स्वतःहून मागितली मनीषा मुसळे-मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

देशातील प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला देश सोडून जायला सांगण्यात आले आहे, त्यामुळे यापेक्षा वेगळी कारवाई असू शकत नाही. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे, हे आपण अनेक वेळा पटवून दिलेले आहे. त्याबाबतची केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे, असेही गोरे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com