Ajitdada Vs Shinde : निधीच्या वादावर भाजप नेत्याचे खळबळजनक विधान; 'एकनाथ शिंदे एक दिवस अजितदादांना थेट कॅबिनेटमध्येच जाब विचारतील...'

Sudhir Mungantiwar : राज्यात तीन पक्षांचे महायुती सरकार आहे. या सरकारमध्ये काही आलबेल असू नये, असे प्रयत्न काही लोक करतात. पण, भाजप हा देश आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्या राष्ट्रहिताच्या विचारातूनच अजित पवारही भाजपसोबत आलेले असावेत.
Sudhir Mungantiwar-Eknath Shinde- Ajit Pawar
Sudhir Mungantiwar-Eknath Shinde- Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 13 April : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार करतील, असं वाटत नाही. मात्र, ज्या दिवशी त्यांना वाटेल, त्या दिवशी ते कॅबिनेटच्या बैठकीत थेट अजितदादांनाच जाब विचारतील, असे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंनी अजितदादांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याच्या चर्चेवर स्पष्ट केले.

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) रविवारी (ता. 13 एप्रिल) हे पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-पवार यांच्यात निधी वाटपावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, देश आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा भाजप हा पक्ष आहे. देशात आणि राज्यात याच भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे अजितदादा पवारही देशहितासाठीच भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याच्या चर्चेवरही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी कोणतीही तक्रार केली नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिंदे हे आक्रमक नेते असून ते तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाहीत. त्यांना वाटत असेल तर तेच एक दिवस कॅबिनेट बैठकीत अजित पवार यांनाच जाब विचारतील, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar-Eknath Shinde- Ajit Pawar
Shivsena Politic's : ‘कामरा’ प्रकरणावरून शिंदेसेनेने मुंबईत काय कमावले अन्‌ ठाकरे सेनेने काय गमावले?

राज्यात तीन पक्षांचे महायुती सरकार आहे. या सरकारमध्ये काही आलबेल असू नये, असे प्रयत्न काही लोक करतात. पण, भाजप हा देश आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्या राष्ट्रहिताच्या विचारातूनच अजित पवारही (Ajit Pawar) भाजपसोबत आलेले असावेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

माझ्याविरोधात काहींचे षडयंत्र

माझ्याविरोधात काहीजण षडयंत्र रचत आहेत, असे मी नाशिकमध्ये विनोदाने बोललो होतो. पण तसं काहीतरी करण्याचे काही लोक मुद्दाम ठरवत आहेत, असं आता वाटू लागलं आहे. त्या माध्यमातून काही तरी विपरीत घडवून आणायचं, असंही काही लोकांनी ठरवलं आहे, असं दिसतंय. शिवाय, मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar-Eknath Shinde- Ajit Pawar
Ramraje Nimbalkar : फलटणच्या आमदारावर पहिल्यांदा अन्‌ शेवटचंच बोलणार; रामराजे नाईक निंबाळकर असं का म्हणाले?

नमामि चंद्रभागेचे काम लवकरच पूर्ण होईल

भीमाशंकर ते पंढरपूर दरम्यान नमामी चंद्रभागा प्रकल्पाला मी अर्थमंत्री असताना मान्यता दिली होती. पुणे, पिंपरी चिंवडसह इतर महापालिका क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 995 कोटी रुपयांची एसटीपी योजना राबविण्यासाठी मंजुरी दिली होती. एसटीपी पंपाचे काम पंढरपुरातही सुरूही झाले आहे. चंद्रभागेचे प्रदूषण घाण पाण्यामुळे वाढत चालेले आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सध्या सुरू आहे. पांडुरंगाच्या कृपेने नमामी चंद्रभागाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षाही मुनंगटीवरा यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com