

Gram Panchayat Election : तालुक्यात सुरू असलेल्या 16 ग्रामपंचायतीत निवडणुकीच्या आखाड्यात दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या तळसंगी ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण झाल्यामुळे या निवडणुकीत दामाजीच्या (Damaji Factory) अध्यक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
18 ग्रामपंचायतीच्या (GramPanchayat Election) आखाड्यामध्ये रहाटेवाडी आणि फटेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे प्रशासनाचा खर्च वाचला आहे. ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षापासून असलेला एकोपा यापुढे त्यांनी कायम ठेवला आहे. सध्या गुंजेगाव, मारापुर, ढवळस, डोंगरगाव, खोमनाळ, भालेवाडी, तळसंगी या नदी व कालवा क्षेत्रातील ग्रामपंचायतच्या निवडणुका मोठ्या चुरशीच्या होत आहेत.
याशिवाय पाटकळ, गोणेवाडी, हाजापूर, गोणेवाडी, शिरनांदगी, पौट, येड्राव, बावची, सोड्डी, मारोळी, या दुष्काळी पट्ट्यातील निवडणुका देखील मोठी चुरस थेट सरपंचामुळे निर्माण झाले आहे. चौदावे व पंधरावे वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत च्या खात्यावर येऊ लागल्यामुळे नदी खर्चाचा अधिकार व सरपंच ग्रामसेवक असल्यामुळे साहजिकच ग्रामपंचायतीवर सत्ता व गावचा प्रमुख होण्यासाठी मोठी चढाओढ लागली आहे.
त्यामुळे सरपंच पदाच्या उमेदवारासह गाव पातळीवरील नेत्यांना मतदाराचे चोचले पुरवण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत दामाजी च्या निवडणुकीत सत्ता मिळण्यासाठी समविचारी गटाचा प्रयोग करण्यात आला तो प्रयोग यशस्वी झाल्यामुळे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतवर गाव पातळीवर सत्ता मिळवण्यासाठी समविचारी आघाडीचा प्रयत्न करून सध्या जात आहे.
दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सुरू केलेल्या सर्व विचाराचा प्रयोग आता तालुकाभर झाला. त्यामध्ये तळसंगी येथे दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या सून पूजा पाटील या आखाड्यात आहेत. त्यांच्या विरोधात तेजश्री शेणवे यांनी आव्हान उभे केले. मारापुर येथे भालके समर्थक दिनकर यादव परिचारक समर्थक हरिभाऊ यादव यांच्या विरोधात अवताडे समर्थक विनायक यादव यांचे कडवे आव्हान आहे. पाटकळ येथे थेट सरपंच पदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. डोंगरगाव येथे थेट सरपंच पदासाठी नात्यागोत्यात लढाई सुरू आहे.
तर हाजापूर येथे पाच सदस्य बिनविरोध झाले आहेत. फक्त थेट सरपंच आणि दोन सदस्य जागेसाठी मोठी चुरस आहे. या ठिकाणी विद्यमान सरपंच धनाजी बिचुकले आखाड्याच्या बाहेर आहेत. या ठिकाणी परिचारक गटाचे नेतृत्व माधवानंद आकळे करत आहेत. तर शिरनांदगी येथे विद्यमान सरपंच मायाका थोरबोले पुन्हा नशीब अजमावत आहे. दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील यांचे बंधू आखाड्यात आहेत. त्यांच्या विरोधात अवताडे समर्थकांनी मोठे आव्हान उभे केले आहे. इथली लढत तिरंगी झाली आहे.
सोड्डी, बावची, पौट, हाजापूर, गोणेवाडी, येड्राव, शिरनांदगी, मारोळी, डोंगरगाव, तर काही ठिकाणी गाव पातळीवर सोयीनुसार आघाड्या करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीमध्ये भालेवाडी येथे दोन अवताडे गटात लढत होत आहे. ग्रामपंचायतीच्या आखाड्यात गोणेवाडीत राष्ट्रवादीचे समर्थक रामेश्वर मासाळ, दामाजीचे संचालक बसवराज पाटील यांचे मारोळी येथील लढती मोठ्या चुरशीची झाल्या.
बावची येथे आवताडे समर्थक अश्पाक पाटील यांच्या गटाविरुद्ध करण्यात आला. डोंगरगाव येथे सरपंच पदाची लढत पंचरंगी झाली. खरी चुरस आकळे, व खिलारे या दोन महिलात आहे, येड्राव येथे निवडणूक मोठी चुरसीची आहे, यामध्ये मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून जवळ केले जात आहे. इथली लढत जातीय समीकरणावर आधारीत आहे मारापुर, मारोळी, ढवळस गुंजेगाव या ठिकाणी तिरंगी लढती तर इतर ठिकाणी दुरंगी लढती पाह्यला मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.