Madha Lok Sabha : मोठ्या पक्षाच्या उमेदवाराच्या अर्जात त्रुटी; पण आक्षेप माझ्या अर्जावर; मोहिते पाटलांंचा इशारा कोणाकडे?

Loksabha Election 2024 : एकमेकांच्या अर्जांवर आक्षेप घ्यायचा नाही, अशी आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, मला गाफील ठेवून वेगळा अर्ज देत डाव साधण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी केला. पण, कायदेशीरदृष्ट्या मी मजबूत होतो.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 April : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात जे काही अर्ज भरण्यात आले आहेत, त्या अर्जांसोबत सोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नासंदर्भातील माहिती तपासा. त्यात तुम्हाला लक्षात येईल की एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने माहिती किती लपवली आहे. माझ्या अर्जात किरकोळ त्रुटी होती. पण, माझ्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या अर्जांत एवढ्या त्रुटी असूनही त्यांचा अर्ज मंजूर झाला, असा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला.

फलटण येथील नंदू मोरे (Nandu More) या अपक्ष उमेदवाराने मोहिते पाटील यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या सुनावणीत मोहिते पाटील यांचा अर्ज मंजूर झाला. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, ही निवडणूक आहे आणि ती मैदानात उतरूनच खेळली पाहिजे. असे रडीचे डाव दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन आक्षेप घेणे हे म्हणजे पुढच्या लोकांनी मैदान सोडल्यासारखं वाटायला लागलं आहे. प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटलं तर या लोकांचं अवघड आहे. आता मी मैदानात उतरलो आहे, त्यांनीही मैदानात यावं, असं रडीचं डाव खेळणं बंद करावं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil
Prakash Ambedkar : 'मोदी हे पंतप्रधान असणं देशासाठी लाभदायक नाही, ते मुख्यमंत्री होते तेव्हा..' ; प्रकाश आंबेडकरांचं विधान!

एकमेकांच्या अर्जांवर आक्षेप घ्यायचा नाही, अशी आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, मला गाफील ठेवून वेगळा अर्ज देत डाव साधण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी केला. पण, कायदेशीरदृष्ट्या मी मजबूत होतो. आमच्यात झालेल्या चर्चेनुसार मी त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला नाही. माढा मतदारसंघातील मतदारांवर माझा प्रचंड विश्वास आहे, त्यांनीच मला उभं केलं आहे, त्यामुळे मी निवडून येणार आहे. पण पुढच्या लोकांना भीती वाटायला लागली आहे, असेही मोहिते पाटील यांनी नमूद केले.

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) येत्या ७ मे पर्यंत उत्तम जानकर यांच्यासाख्या अनेक गोष्टी घडणार आहेत. ही निवडणूक जनता विरुद्ध नेते अशी आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. माझा माझ्या मतदारसंघातील मतदारांवर विश्वास आहे. शरद पवार यांच्यावर या मतदारसंघातील लोकांचे प्रेम आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Rohit Pawar Vs Ajit Pawar : पवारांवर बांदलांची टीका; रोहित पवारांचा अजितदादांना खडा सवाल; म्हणाले...

मोदींच्या सभेचा परिणाम होणार का?, यावर तुम्ही मतदारसंघात फिरा म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला वस्तुस्थिती कळेल, असे उत्तर मोहिते पाटील यांनी दिले. ते म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या सहा सभा होणार आहेत. येत्या २४ तारखेपासून मोडनिंबपासून पवार यांच्या सभांना सुरुवात होणार आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Lok Sabha Election 2024 : शिर्डीमध्ये पक्ष चिन्हावर निवडणूक लढू शकत नव्हतो; निष्ठावंत नांदगावकर असं का म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com