purushottam barde- Ajay Dasari
purushottam barde- Ajay DasariSarkarnama

Shivsena UBT : ठाकरेसेनेत संघर्ष पेटला; दासरींच्या प्रभागात 2 नगरसेवक निवडून आले तरी त्यांच्या गाडीचा चालक बनेन, बरडेंचे चॅलेंज

Ajay Dasari VS Purushottam Barde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अजय दासरी आणि पुरुषोत्तम बरडे यांच्यात गंभीर संघर्ष उफाळून आला असून पक्ष एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published on
  1. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रा. अजय दासरी व पुरुषोत्तम बरडे यांच्यात तीव्र अंतर्गत वाद उफाळला आहे, एकमेकांवर सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप सुरू असून “प्रभाग १३ मधून दोन नगरसेवक जिंकवून दाखवा” असे बरडेंनी दासरींना थेट आव्हान दिले आहे.

  2. उपनेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे सोलापूर दौऱ्यावर असून दोन्ही नेत्यांतील वाद मिटविणे, महापालिका निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढायची की स्वतंत्र, याबाबत चर्चा आणि पक्षश्रेष्ठींना अहवाल देणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  3. बरडे यांनी मुलीच्या संभाव्य निवडणूक लढवण्याबाबतची भूमिका, पोस्ट फॉरवर्ड करणे आणि पदाधिकाऱ्यांवरील टीका हे पक्षविरोधी असल्याचा आरोप दासरींनी केला तर बरडेंनी खैरे-कोकिळ यांना सोलापूरची माहिती नसल्याचा टोलाही लगावला आहे; त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत.

Solapur, 08 December (प्रभूलिंग वारशेट्टी) : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात उफाळून आला आहे. जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी आणि सोलापूर लोकसभा मतदासंघाचे प्रमुख पुरुषोत्तम बरडे हे एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. बरडे हे पक्षविरोधी भूमिका घेत आहे, असा आरोप दासरी यांनी नोंदविला आहे, तर दासरींनी त्यांच्या प्रभाग 13 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन जरी नगरसेवक निवडून आणले तरी आपण त्यांच्या गाडीवर चालकाचे काम करेन, असे आव्हान दिले आहे, त्यामुळे बरडेंचे चॅलेंज दासरी स्वीकारतात हे पाहावे लागणार आहे.

शिवसेनेचे (Shivsena UBT) उपनेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उद्या (ता. ०९ डिसेंबर) शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दासरी आणि बरडे यांच्यातील वादावर खैरे काय तोडगा काढणार, याची उत्सुकता आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नसल्याचे दिसून येत आहे.

मागील बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासमोरच पदाधिकारी आणि नेते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात खैरे या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडविणार का, याचीही उत्सुकता आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं, यावर चर्चा होणार आहे. तसेच, निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत. त्याबाबतचा अहवाल ते पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुलांनी केलेल्या पोस्ट बरडे यांनी स्वतः फॉरवर्ड केल्या आहेत. एकीकडे स्वतः शिवसेनेत ठाकरेंसोबत राहणार, असे म्हणायचे आणि दुसरीकडे मुलगी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवू शकते, अशीही भूमिका घ्यायची म्हणजे ते पक्षाच्या हिताविरोधात आहे, असा दावा दासरी यांनी केला आहे.

purushottam barde- Ajay Dasari
IndiGo Crisis : इंडिगोचे क्रायसिस अन्‌ इलेक्टोरल बॉण्डद्वारे भाजपला मिळालेले 56 कोटी; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला संशय...

दासरी यांना उत्तर देताना पुरुषोत्तम बरडे यांनी त्यांना चॅलेंज दिले आहे. दासरी यांनी त्यांच्या प्रभाग क्र.१३ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फक्त दोन नगरसेवक जरी निवडून आणले तर मी स्वत: दासरी यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करेन, असे आव्हान बरडेंनी दिले आहे. आता ते आव्हान दासरी हे स्वीकारतात, हे पाहावे लागणार आहे.

सोलापूर प्रभारी चंद्रकांत खैरे आणि सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांना सोलापूरबद्दल काहीही माहिती नाही, अशी टीका बरडे यांनी केली होती. तसेच, नगरपरिषद निवडणुकांमध्ये एबी फॉर्म देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर हल्लाबोल केला होता, त्यानंतर खैरे हे प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यामुळे खैरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

purushottam barde- Ajay Dasari
Gopichand Padalkar : विरोधी पक्षनेतेपद कधी नेमणार?; फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराने वर्षंच सांगून टाकलं....

1) दासरी–बरडे वादाचा मुख्य मुद्दा काय?
पक्षातील निर्णयप्रक्रिया व प्रभाग १३ मधील प्रभावाबाबत दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

2) चंद्रकांत खैरे यांच्या भेटीचे महत्त्व काय?
ते दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करतील आणि महापालिका निवडणूक रणनीती ठरवतील.

3) बरडे यांनी दासरींना दिलेले आव्हान काय आहे?
प्रभाग १३ मधून शिवसेनेचे दोन नगरसेवक जिंकवून आणले तर दासरींच्या गाडीवर मी चालक बनेन, असे त्यांनी म्हटले आहे.

4) दासरींचा बरडेंवर मुख्य आरोप कोणता?
बरडे पक्षविरोधी भूमिका घेत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाच्या निवडणूक भूमिकेमुळे गोंधळ निर्माण होत असल्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com