IndiGo Crisis : इंडिगोचे क्रायसिस अन्‌ इलेक्टोरल बॉण्डद्वारे भाजपला मिळालेले 56 कोटी; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला संशय...

Prithviraj Chavan's Doubts : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिगो संकटावर केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप करत तात्काळ कारवाई, राजीनामा आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी केली.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on
  1. इंडिगोमध्ये अलीकडे निर्माण झालेल्या मोठ्या प्रवासी क्रायसिससाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र, DGCA आणि विमान कंपन्यांना जबाबदार धरत मंत्री, DGCA अधिकारी आणि इंडिगो CEO यांच्या राजीनाम्या-निलंबनाची मागणी केली.

  2. विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो (65%) आणि टाटा समूह (30%) यांची वाढती मक्तेदारी धोकादायक असून DGCA ने नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

  3. इंडिगोचे दोन भाग करणे, मक्तेदारी रोखण्यासाठी नवी समिति स्थापन करणे, प्रवाशी नुकसानभरपाईसाठी 1000 कोटींचा विशेष फंड तयार करणे आणि सरकारी विमान कंपनी सुरू करणे अशा मागण्या चव्हाण यांनी मांडल्या.

Karad, 08 December : इंडिगो विमानसेवेतील अलीकडच्या काळातील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, डीजीसीए आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी (Union Aviation Minister) तात्काळ राजीनामा द्यावा, डीजीसीएचे जबाबदार अधिकारी बडतर्फ करावेत, इंडिगोचे सीईओ यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करुन विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका चव्हाण यांनी ठेवला.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले की, इंडिगोचा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार आहे. हे सर्व डीजीसीए आणि केंद्र सरकारने इंडिगोला दिलेल्या सूट आणि ढिलाईमुळे घडले आहे. डीजीसीएने एक जुलै २०२४ पासून लागू करायच्या नियमांची अंमलबजावणी न केल्याने मक्तेदारी वाढत गेली.

विमान क्षेत्रात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी राहिली आहे. इंडिगो ६५ टक्के आणि टाटा समूह ३० टक्के ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. अशा मक्तेदारीला रोखण्यात पूर्ण अपयश आले असून, हा आयोग बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.

Prithviraj Chavan
Leader of Opposition : विरोधी पक्षनेता कोणाला करायचं? ते आधी ठरवा; शिंदेंच्या शिलेदाराचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

इंडिगोचे दोन भाग करून दोघांचा जास्तीत जास्त ३०-३० टक्के मार्केट शेअर ठेवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. इंडिगोच्या मालकांनी बीजेपीला इलेक्टोरल बॉण्डद्वारे ५६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचा डीजीसीएच्या निर्णयांशी काही संबंध आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.

अदानी डिफेन्सने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी देशातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग संस्थेची खरेदी केली आहे, त्यामुळे या क्षेत्रातसुद्धा मक्तेदारी वाढण्याची भीती आहे. कारण काही दिवसांपूर्वीच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी जाहीर केले की, येत्या १०-१५ वर्षांत देशात ३० हजार पायलटची गरज भासू शकते आणि त्यानंतरच अदानी यांनी ही ट्रेनिंग संस्था विकत घेतली.

प्रवाशांनी दुप्पट-तिप्पट किमतीत तिकीट घेतल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल सरकारने किमान एक हजार कोटींचा विशेष फंड तयार करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. भोपाळ गॅस दुर्घटनेप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी आणि सरकारने विमान वाहतूक क्षेत्र खासगीच्या हातात जाऊ न देता स्वतःची एक विमान कंपनी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Prithviraj Chavan
Barshi Bazar Samiti Result : नगरपरिषद निकालाआधीच राजेंद्र राऊतांनी गुलाल उधळला; बार्शी बाजार समितीच्या सर्व 18 जागा जिंकून सोपल गटाचा उडवला धुव्वा...

1. इंडिगो क्रायसिससाठी पृथ्वीराज चव्हाण कोणाला जबाबदार धरतात?
केंद्र सरकार, DGCA आणि इंडिगो व्यवस्थापनाला ते थेट जबाबदार धरतात.

2. विमान क्षेत्रातील कोणती समस्या गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले?
इंडिगो आणि टाटा समूहाची वाढती मक्तेदारी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले.

3. चव्हाण यांनी कोणती मुख्य कृती करण्याची मागणी केली?
मंत्री आणि DGCA अधिकाऱ्यांचा राजीनामा, इंडिगो CEO चे निलंबन आणि नवी चौकशी समिती.

4. प्रवाशांच्या नुकसानीबाबत त्यांनी काय उपाय सुचवला?
किमान 1000 कोटींचा विशेष नुकसानभरपाई फंड सरकारने तयार करावा, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com