अजित पवारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; डॉ.शालिनीताईंचे राज्यपालांना निवेदन

डॉ. शालिनीताई पाटील यांनी म्हटले की, मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही.
Bhagatsing Koshyari, Shalinitai Patil
Bhagatsing Koshyari, Shalinitai Patilsakal Reporter
Published on
Updated on

कोरेगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कवडीमोल भावाने गिळंकृत केला. आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा अधिकार वापरून बेकायदेशीरपणे जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला. त्यामुळे अजितदादांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी जबाबदार असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा दुरूपयोग करून कारखान्याचा बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन ऊस उत्पादक सभासदांचा विश्वासघात केला आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात डॉ. शालिनीताई पाटील यांनी म्हटले की, मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही.

Bhagatsing Koshyari, Shalinitai Patil
जरंडेश्वरवरील कारवाईवरून डॉ. शालिनीताई पाटील म्हणतात : देवाच्या काठीला आवाज नसतो....

हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केली आहे. अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कमी किमतीत बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन कोरेगाव-खटाव तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. उच्च न्यायालयाने अजितदादांची फसवणूक उघडकीस आणली आणि साखर कारखान्याच्या विद्यमान खाजगी संचालकांच्यावर गुन्हे दाखल केले. आज ईडीच्या माथ्यमातून साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई ईडीच्या माध्यमातून सुरु आहे.

Bhagatsing Koshyari, Shalinitai Patil
`जरंडेश्वर`मध्ये काळा पैसा पांढरा केला; फेक कंपन्यांतून तो काऱखान्यात आणला...

कमी किमतीत सहकारी साखर कारखाने गिळंकृत करणाऱ्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मंत्री मंडळातून काढून टाकण्याची शिफारस राज्य शासनाकडे राज्यपालांनी करावी, अशी मागणी माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीरंग सापते, संचालक पोपटराव जगदाळे, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक अक्षय बर्गे, काकासाहेब कदम, शंकर मदने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com