Khatav News : १२ हजारांची लाच घेताना खटावचे विस्तार अधिकारी जाळ्यात

Bribery एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी विस्तार अधिकारी सोनावले यांनी ग्रामसेवकाकडे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
Bribery
Briberysarkarnama

Satara News : विरोधात आलेल्या तक्रारीवरुन कारवाई न करण्यासाठी ग्रामसेवकांकडे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना खटाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून Anti-Corruption Division मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ग्रामसेवक Gramsevak आहेत. त्यांच्या विरोधात विस्तार अधिकाऱ्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींवरुन विस्तार अधिकारी संजय सोनावले हे तक्रारदाराना मानसिक त्रास देत होते.

कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठवून निलंबित करेन असे धमकावत होते. एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी विस्तार अधिकारी सोनावले यांनी ग्रामसेवकाकडे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

Bribery
Nalasopara Police Inspector Bribe Case: 'आरोपीला जामीन देतो, एक लाख रूपये पोहोचवा'; पोलीस इंस्पेक्टर सापळ्यात अडकला!

ती स्वीकरताना विस्तार अधिकारी सोनावले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ‌ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती उज्वला वैद्य, पोलिस नाईक प्रशांत नलावडे, तुषार भोसले, निलेश चव्हाण, मारुती अडागळे यांनी केली.

Bribery
Satara Bribe News : पंधराशे रूपयांची लाच घेताना दुय्यम निबंधकास पकडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com