Sangola News : विधान परिषदेच्या धामधुमीतच शेकाप आमदाराच्या सूतगिरणीला मदत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय...

Dr. Bhai Ganpatrao Deshmukh Spinning Mill : सांगोल्यातील डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीला राज्य सरकारकडून ६३.३५ लाख रुपयांचा व्याज परतावा मंजूर झाला आहे.
Dr. Bhai Ganpatrao Deshmukh Spinning Mill
Dr. Bhai Ganpatrao Deshmukh Spinning Mill Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 June : ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील ‘डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी’ला फडणवीस सरकारने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. या सूतगिरणीने वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याज परताव्याची रक्कम अदा करण्यासाठी ६३ लाख ३५ हजार ३३१ रुपयांचा निधी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने मंजूर केला आहे.

महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) हे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे डॉ. देशमुख यांची उपस्थिती आणि राज्य सरकारचा निर्णय एकाच वेळी येण्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्यातील सहकारी सूतगिरण्या (Spinning Mill) सुरळीत चालाव्यात आणि आर्थिक अरिष्ट्यातून बाहेर काढता यावे, यासाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये एक विशेष योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत सहकारी सूतगिरण्यांनी वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून प्रति चाती (Spindles-सूत कातण्याची यंत्रणा) ५,००० रुपये प्रमाणे ५ वर्षांसाठी घेतलेल्या मध्यम मुदतीच्या कर्जावर कमाल १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज सरकारकडून दिले जाते.

Dr. Bhai Ganpatrao Deshmukh Spinning Mill
Abhijeet Patil : भाजपविरोधात शड्डू ठोकणाऱ्या मोहिते पाटलांच्या उमेदवारास पवारांच्या आमदाराचा विरोध; पंचायत समितीतील भूमिका नडली

सांगोला येथील डॉ. भाई गणपतराव देशमुख सूतगिरणीने (एकूण ४३,१०४ चात्या) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर बँकांकडून २,१५५.२० लाख रुपये इतके मुदत कर्ज घेतले आहे. या कर्जावरील १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या त्रैमासिक कालावधीतील एकूण ६३ लाख ३५ हजार ३३१ रुपयांचे व्याजाची रक्कम देण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे.

थेट बँकेच्या खात्यात होणार निधी जमा

डॉ. भाई गणपतराव देशमुख सूतगिरणीने आपल्या थकीत बिनव्याजी कर्जाची संपूर्ण रक्कम आधीच परतफेड केली आहे, त्याबाबतची खातरजमा वस्त्रोद्योग आयुक्तांनी केली आहे. त्यानंतरच हे मंजूर व्याज प्रदान करण्यात आले आहे. मंजूर झालेली ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सोलापूर येथील बाळी वेस शाखेतील सूतगिरणीच्या अधिकृत खात्यात RTGS द्वारे थेट वर्ग केली जाणार आहे.

Dr. Bhai Ganpatrao Deshmukh Spinning Mill
Mohite Patil Vs Gore : मोहिते पाटील-सोपलांच्या खेळीने जयकुमार गोरेंचं स्वप्न उधळलं; सोलापुरात देशमुखांचे राऊतांना चॅलेंज!

दर तीन महिन्यांनी द्यावा लागणार अहवाल

सरकारने या निधीला मंजुरी देतानाच वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या सूतगिरणीने घेतलेल्या कर्जावरील पुढील कालावधीत देय होणाऱ्या व्याज प्रदानाचा तिमाही अहवाल (Quarterly Report) नियमितपणे सरकारला सादर करणे बंधनकारक असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com