Abhijeet Patil : भाजपविरोधात शड्डू ठोकणाऱ्या मोहिते पाटलांच्या उमेदवारास पवारांच्या आमदाराचा विरोध; पंचायत समितीतील भूमिका नडली

Solapur Vidhan Parishad election 2026 : वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीपासून आमदार अभिजीत पाटील यांनी अलिप्तता दर्शवल्याने सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अंतर्गत मतभेद चर्चेत आले आहेत.
Vasntrao deshmukh-Abhijeet Patil
Vasntrao deshmukh-Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 04 June : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यात लढत होत आहे. भलेमोठं बहुमत पाठीशी असलेल्या भाजपशी दोन हात करण्याची तयारी करणारे देशमुख यांना पक्षातून विरोध सुरू झाला आहे. ‘मला विश्वासात न घेता वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीशी माझा काहीही संबंध नाही,’ असे विधान आमदार अभिजीत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून मतदानपूर्वीच पवारांच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीत सोलापूरमध्ये (Solapur) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. काॅंग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक वसंतराव देशमुख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

देशमुख यांची स्वतःची फारसी राजकीय ताकद नसली तरी महाविकास आघाडी आणि मोहिते पाटील यांची राजकीय ताकद उभी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीला आता सरळसरळ मोहिते पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे असे स्वरुप आले आहे. त्यातच माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी त्यांच्याच पक्षाचे वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध दर्शवला आहे. पक्षाच्या आमदारानेच विरोध केल्याने पक्षातच मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे.

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर आणि माढा तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) चिन्हावर निवडणूक लढवली होती. यामध्ये पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार, तर पंचायत समितीचे 6 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.

Vasntrao deshmukh-Abhijeet Patil
Mohite Patil Vs Gore : मोहिते पाटील-सोपलांच्या खेळीने जयकुमार गोरेंचं स्वप्न उधळलं; सोलापुरात देशमुखांचे राऊतांना चॅलेंज!

पंचायत समितीमधील तो सल

पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागा भाजप आणि 8 जागांवर आमदार अभिजीत पाटील, भगीरथ भालके आणि वसंतराव देशमुख यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले होते. दोन्ही गटाकडे समान संख्याबळ होते. त्यामुळे पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला महत्व आले होते. त्यावेळी वसंतराव देशमुख यांनी भाजपला सहकार्य केले, त्यामुळे भाजपचा सभापती आणि देशमुख गटाचा उसभापती निवडून आला.

सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी वसंतराव देशमुख यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याची सल आमदार अभिजीत पाटील यांच्या मनामध्ये आजही आहे. त्यातूनच आमदार पाटील यांनी देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तीन महिन्यांपूर्वी देशमुख यांनी भाजपपूरक भूमिका घेतली, त्यानंतर आता भाजपविरोधात भूमिका घेतल्याची चर्चा सुरु आहे.

मला विश्वासात घेतले नाही : अभिजीत पाटील

पंढरपूर पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत वसंतराव देशमुख यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन भाजपला मदत केली, त्यामुळे सभापती निवडीत तुतारीचा उमेदवार पडला आणि मिळालेली सत्ता गेली.

Vasntrao deshmukh-Abhijeet Patil
Gokul Politics : महायुतीला कोर्टात तोंडावर पडण्याची भीती अन् रात्रीत फिरला गेम : गोकुळमधील ४२७ अपात्र संस्थेतील २७० संस्था पुन्हा पात्र

विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना मला कुठेही त्यांनी विश्वासात घेतले नाही. माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. मला त्यांनी एकाही बैठकीला बोलावले नाही. त्यामुळे वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीशी आणि माझा कोणताही संबंध नाही, असे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com