Solapur, 31 August : बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची लायकी काढणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही सावंतांना चांगलेच सुनावले आहे. तुम्हाला शेतकरी सोडणार नाहीत, असा इशारा जरांगे पाटील यांनी मंत्री सावंतांना दिला आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शुक्रवारी मतदारसंघात गाव संवाद दौरा केला. त्या दौऱ्यात पिंपळगाव येथील कार्यक्रमात एका शेतकऱ्याने (Farmer) बंधाऱ्याची दुरुस्ती करून दरवाजे बसविण्याची मागणी केली. त्या वेळी दरवाजे बसवले जातील, असे सांगितले. पण केवळ दरवाजे बसवून उपयोग नाही, बंधारा दुरुस्तीची गरज आहे, असे म्हणताच तानाजी सावंत संतापले. त्यांनी शेतकऱ्याची लायकी काढली. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
मालवणला जात असताना सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सावंत यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांच्या बाबत केलेले विधान दुरुस्त करावे. तुमच्याकडे जे काय पद आले, त्यामुळे तुम्ही लोकांना वाटेल ते तोंड टाकून बोलू शकत नाही.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे दूरगामी परिणाम होणार आहेत आणि शेतकरीही सावंत यांना सोडणार नाहीत, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सावंतांना दिला.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजासाठी मी राज्य सरकारला अंगावर घेतलं आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे, त्यानंतर मुस्लिम, धनगर आणि शेतकरी यांच्या प्रश्नावरही मी सरकारच्या मागे लागणार आहे.
येत्या 30 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारावं लागेल. कारण 2024 मिशन हातात घेऊन आता तेच आंदोलन सर्व समाजाचे समजावं. माझ्या मराठा समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, यासाठी मी जीवाची बाजी लावत आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.