Solapur, 21 April : सोलापूरमध्ये ‘एमआयएम’ने उमेदवार दिलेला नाही. कारण, काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत मशिदीमधून फतवे निघत आहेत. मात्र, या फतव्याविरोधात येथील समाज एक होईल आणि नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहील. मोदींना पाडण्यासाठी सोलापुरातील मशिदीतून फतवे निघत आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला.
सोलापूरमध्ये (Solapur) माध्यमांशी बोलताना आमदार सातपुते (Ram satpute) यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, जिहादींना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता राहिलेली आहे. सोलापूरमध्ये MIM ने उमेदवार दिलेला नाही. कारण, काँग्रेसला (Congress) पाठिंबा देण्याबाबत मशिदीमधून फतवे निघत आहेत. मात्र, या फतव्याविरोधात येथील समाज एक होईल आणि मोदींच्या पाठीशी उभा राहील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदींना (Narendra modi) पाडण्यासाठी सोलापुरातील मशिदीतून फतवे निघत आहेत, त्याचा मी निषेध करतो. सोलापुरात मोदींना पाडण्यासाठी मौलवी फिरत आहेत. वेगवेगळी पत्रकं काढली जात आहेत. उर्दू भाषेतील पत्रकं घराघरांत जात आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला खुलं आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. पण, संविधान वाचवण्यासाठी मोदींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन सातपुते यांनी केले.
कर्नाटकातील हिंदू युवतीच्या हत्या प्रकरणावर सातपुते म्हणाले, हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली आहे. हिंदू तरुणीने फैयाज शेखचे प्रपोज नाकारल्याने तिची निर्घृण हत्या केली. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो, असेही सातपुते म्हणाले.
ते म्हणाले, नेहा हिरमेठ हिच्या मारेकऱ्याला सरकार किंवा प्रशासनाने ठेचून काढले पाहिजे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून जिहादींना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. नेहाचा मारेकरी असलेल्या फैयाज शेखला फासावर लटकविण्याची मागणी मी करतो.
अक्कलकोट भागामध्ये अवकाळीमुळे जे नुकसान झाले आहे, त्याबाबत प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी मी प्रशासनाकडे केली आहे, असेही सातपुते यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.