Solapur, Madha Lok Sabha : मोहिते पाटील-शिंदेंचे कडवे आव्हान; मोदींच्या सातपुते, निंबाळकरांसाठी स्वतंत्र दोन सभा

Loksabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी 30 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर शहरातील मरीआई चौकातील भंडारी मैदानावर सभा होणार आहे. माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस येथे दुपारी पावणे तीनच्या सुमारास सभा आयोजित केली आहे.
Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik MimbalkarSarkarnama

Solapur, 21 April : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या ह्या सभा ३० एप्रिल रोजी माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात होणार आहेत. या सभांचा फायदा किती होणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत भाजप उमेदवारांपुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी कडवे आव्हान उभे केले आहे, त्यामुळे स्थानिक नेतृत्वाचा मोदींच्या दोन सभांसाठी आग्रह होता, त्यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी मोदींच्या (Narendra Modi) दोन स्वतंत्र सभा होणार आहेत. मागील २०१९ च्या निवडणुकीत मोदी यांची अकलूज येथेच फक्त एक सभा झाली होती.

Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
Madha Lok Sabha : मोठ्या पक्षाच्या उमेदवाराच्या अर्जात त्रुटी; पण आक्षेप माझ्या अर्जावर; मोहिते पाटलांंचा इशारा कोणाकडे?

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ३० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर शहरातील मरीआई चौकातील भंडारी मैदानावर सभा होणार आहे. माढ्याचे (Madha Lok Sabha Constituency) उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस येथे दुपारी पावणे तीनच्या सुमारास सभा आयोजित केली आहे, अशी माहिती सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी दिली.

सोलापूरच्या होम मैदानावर २०१४ मध्ये शरद बनसोडे यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी अकलूज येथे सभा घेतली होती. यंदा मात्र माढ्यात मोहिते पाटील यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यांनी निंबाळकर यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. याच मोहिते पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य दिले होते.

Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
Prakash Ambedkar : 'मोदी हे पंतप्रधान असणं देशासाठी लाभदायक नाही, ते मुख्यमंत्री होते तेव्हा..' ; प्रकाश आंबेडकरांचं विधान!

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना आव्हान दिले आहे. या मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असूनही शिंदे यांनी सातपुते यांच्याशी निकराची लढाई सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघात अस्तित्व पणाला लागलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोदींच्या सभांसाठी आग्रह धरला आहे. त्यातून ३० एप्रिल रोजी सकाळी आणि दुपारी सोलापूर आणि माळशिरस येथे मोदी यांच्या सभा होणार आहेत.

Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
BJP Candidate Sarvesh Singh Dies : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी दु:खद बातमी; लोकसभा उमेदवाराचं निधन...

साताऱ्यातील सभेचा निंबाळकरांनाही फायदा

माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांच्यासाठी माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. त्या सभेनंतर ते सातारा येथे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभा घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत, त्यामुळे साताऱ्यातील सभेचा माढ्याच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो, असे भाजपकडून सांगण्यात आले.

Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
Vinod Patil : भुमरेंची उमेदवारी जाहीर होताच शिंदे - फडणवीसांसमोर नवा पेच; विनोद पाटील लढण्यावर ठाम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com