Satara : साताऱ्यात गोळीबार; दांडीयातील वादातून प्रकार, पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

या प्रकाराची माहिती मिळाल्‍यानंतर शाहूपुरी Shahupuri पोलिस Police ठाण्‍याचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले.
Crime News
Crime Newssarkarnama

सातारा : दांडीया दरम्‍यान झालेल्‍या वादानंतर पाठलाग करत युवकासह स्‍थानिक नागरिकांवर मंगळवार पेठेतील मनामती चौकात बुधवारी मध्‍यरात्री गोळीबार करण्‍यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात पाच जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून सातारा पोलिसांनी घटनास्‍थळावरुन गोळ्या, पुंगळ्या तसेच धारदार शस्‍त्रे जप्‍त केली आहेत.

अमीर शेख (रा.वनवासवाडी), अभिजित भिसे (रा. यश ढाब्‍यामागे, कोंडवे), साहिल सावंत (रा. कोटेश्‍‍वर मंदिराजवळ, शुक्रवार पेठ), आहत (पूर्ण नाव नाही), यश सुभाष साळुंखे (रा. मोळाचा ओढा) अशी गुन्‍हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

Crime News
राजकीय वाद इतका टोकाला गेला की पोलिसांसमोरच सेना-भाजप कार्यकर्त्यांची मारामारी

साताऱ्यातील व्‍यंकटपुरा पेठेत यश संजय बीडकर (वय २२) हा राहण्‍यास आहे. तो बुधवारी (ता. ५) रात्री मित्रासमवेत सेंट पॉल स्‍कुलच्‍या मैदानावरील दांडियात खेळण्‍यासाठी गेला होता. येथून परतत असताना अभिजित भिसे याने यशच्‍या सोबत असणाऱ्या सर्वेश महाडिकच्‍या पायावर दुचाकी घातली. यावरुन त्‍यांच्‍यात वाद झाला.

Crime News
शिंदे गट ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत : भुमरेंनी घेतला पुढाकार!

वादानंतर यश हा मित्रसमवेत त्‍याठिकाणाहून निघून गेला. थोड्यावेळानंतर अमीर शेख, अभिजित भिसे हे साथीदारांसमवेत दुचाकीवरुन मनामती चौकात आले. याठिकाणी थांबलेल्‍या यश बीडकरला पाहून अमीर शेखने कमरेला असणारी पिस्‍तुल काढली. आज तुम्‍हाला सुट्टी देत नाही, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्‍हणत शेखने यशच्‍या दिशने गोळी झाडली.

Crime News
Satara : लोकसभेप्रमाणे सातारा पालिकेतही उदयनराजेंना नारळ द्या... शिवेंद्रसिंहराजे

मात्र, त्‍याने ती चुकवली. याचदरम्‍यान, त्‍याठिकाणी घडशी नावाचा एक व्‍यक्‍ती आला. घडशींनी शेख याला असे करु नको, असे सांगण्‍यास सुरुवात केली. यावेळी शेखने घडशी यांना पकडत त्‍यांच्‍या डोक्‍याला पिस्‍तुल लावले व चाप ओढला. मात्र, गोळी मिसफायर झाली व खाली पडली. आरडाओरडा ऐकून नागरीक जमा होत असल्‍याचे पाहून अमीर शेखसह इतरांनी त्‍याठिकाणाहून पळ काढला.

Crime News
सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

या प्रकाराची माहिती मिळाल्‍यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्‍याचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले. त्‍यांनी पाहणी करत घटनास्‍थळावरुन रिकामी पुंगळी, जिवंत गोळ्या व इतर घातक शस्‍त्रे जप्‍त केली. घटनास्‍थळाची पाहणी नंतर पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी केली. यश बीडकरच्‍या फिर्यादीनुसार अमीर शेखसह पाच जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. गोळीबार केल्‍यानंतर संशयित पळून गेले असून त्‍यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. याचा तपास उपनिरीक्षक बशीर मुल्‍ला हे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com