

Satara, 30 March : प्रा. खासदार ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर प्रथमच संधी मिळाली आहे, त्यामुळे त्या जनतेच्या प्रश्नावर बोलतील, अशी अपेक्षा आहे. पण, दिल्लीत गेल्यानंतर त्या ऑपरेशन कधी करायला लागल्या, हे मला कळत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लगावला.
नांदेडच्या दौऱ्यावर असताना खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare ) यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार, जे पण होणार ते योग्य वेळी होणार असल्याचे विधान खासदार वाघमारे यांनी केले होते. त्याला शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यावं. त्यांना पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे. आता जे काय इराण आणि अमेरिका-इस्त्राईल युद्ध सुरू आहे. त्याचा जो काही परिणाम झालेला आहे, लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यावर वाघमारे यांनी बोलावं.
रिक्षा चालकांना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यापुढे प्रश्ना मांडताना आश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे मंगलप्रभात लोढा यांनीही गॅसटंचाईबाबत पत्रातून भाष्य केलेले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही प्रकारची गॅस टंचाई नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे गॅस टंचाईमुळे हॉटेलमधील पदार्थ कमी होत आहेत. टंचाई, युद्धपरिस्थिती आणि भविष्यातील संकट त्यावर खासदार वाघमारे यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला शिंदे यांनी दिला आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले, माझ्या माहितीनुसार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आमचे खासदार दिल्लीत युद्ध आणि त्याचे परिणाम यावर आक्रमकपणे बोलत आहेत. आमचं ऑपरेशन वगैरे काही नाही. एखादेवेळी पर्याय निर्माण होतो आणि तो पर्याय आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवारसाहेबांचा पक्ष चर्चेत आणण्याचे काम कोण करतंय. कशासाठी हे ऑपरेशन राज्यात आणि केंद्रातही केलं जात आहे. आमचा एकही खासदार फुटणार नाही.
सत्ताधारी पक्षाकडे एवढं बहुमत असताना हे फोडोफोडीचं राजकारण का केलं जात आहे, हे मला कळत नाही असा सवालही शशिकांत शिंदे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.