MLC Election : आमदार भोसलेंनंतर माजी मंत्री पाटील समर्थक नगरसेवकांनी एकत्रित येऊन केले विधान परिषदेसाठी मतदान

Sangli-Satara Vidhan Parishad Election 2026 : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानासाठी एकत्र आल्याने केंद्रावर गर्दी झाली.
Sangli-Satara Vidhan Parishad Election
Sangli-Satara Vidhan Parishad ElectionSarkarnama
Published on
Updated on

Karad, 18 June : सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी आज गुरुवारी (ता. १८ जून) मतदान होत आहे. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मतदान केंद्रावर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी एकत्र येत मतदानाचा हक्क बजावला. अचानक एकदम नगरसेवक आल्यामुळे मतदान केंद्र परिसरात मोठी गर्दी झाली होती.

सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप हे निवडणूक रिंगणात आहेत. आज गुरुवारी विधान परिषदेसाठी मतदान होत आहे त्यासाठी कराड येथे विधान परिषद निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तहसीलदार कल्पना ढवळे गटविकास अधिकारी प्रताप पाटील कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत हटकर मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी मतदानासाठी कार्यरत आहेत

Sangli-Satara Vidhan Parishad Election
Political Party Split : पडद्यामागे नक्की काय शिजतंय? आणखी एका पक्षाला सुरुंग लागण्याच्या तयारीत, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

विधान परिषद मतदानासाठी आज सकाळी प्रारंभ झाला. पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक नितीन काशीद पाटील यांनी, त्यानंतर भाजपच्या मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेविका स्वाती थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Sangli-Satara Vidhan Parishad Election
Ritabrat Banerjee : ऋतब्रत बॅनर्जींच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवडीच्या वादात नवा ट्विस्ट! हायकोर्टानं व्यक्त केला संशय; सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं?

त्यानंतर भाजपचे मलकापूर मधील नगरसेवक एकत्रित येत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यानंतर कराड नगरपालिकेतील माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थक लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी येऊन मतदानाचा हक्क बजावला.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com