Ritabrat Banerjee : ऋतब्रत बॅनर्जींच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवडीच्या वादात नवा ट्विस्ट! हायकोर्टानं व्यक्त केला संशय; सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं?

Ritabrat Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर टीएमसी (TMC) आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना 'विरोधी पक्षनेते' म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Published on
Updated on

Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी बंडखोर टीएमसी (TMC) आमदार रिताब्रता बॅनर्जी यांना 'विरोधी पक्षनेते' म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची पसंती असलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्याऐवजी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्या. कृष्णराव यांनी हा आदेश दिला. यामुळं ममता बॅनर्जी यांना मोठा झटका मानला जात आहे.

Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Shiv Sena UBT news : ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिल्लीतील बैठकीबाबत महत्वाची अपडेट; चार खासदारांची उपस्थिती, कुणाची दांडी?

त्याचबरोबर तीन आठवड्यांसाठी याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं पुढील सुनावणीवेळी सर्व पक्षकारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. काल या प्रकरणावर सखोल सुनावणी पार पडली त्यावेळी कोर्टानं वारंवार विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. कोर्टानं हे देखील विचारलं की, तृणमूलच्या नेतृत्वानं चटोपाध्याय यांची निवड केली असेल तर ते प्रकरण प्रलंबित का ठेवलं गेलं आणि फुटीर आमदारांच्या गटाचा प्रस्ताव तातडीनं मंजूर करण्यात आला?

Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Teachers News: शिक्षकांना मोठा दिलासा! अशैक्षणिक कामांना ब्रेक; आता अध्यापनासाठी अधिक वेळ

दरम्यान, न्यायमूर्ती कृष्णराव यांनी हे निरिक्षण नोंदवताना म्हटलं की, या प्रकरणातला महत्वाचा मुद्दा हा नाही की पहिल्या प्रस्तावावेळी खोट्या सह्या करण्यात आल्या होत्या. तर मुख्य मुद्दा हा आहे की, विधानसभा अध्यक्षांनी संबंधित सर्व पक्षकारांच मत विचारात न घेता एक प्रस्ताव नाकारला आणि दुसऱ्याला मान्यता दिली.

Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Jalgaon MLC Election : एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् रात्रीत गेम फिरला, गिरीश महाजनांच्या शिलेदाराचा विजयाचा मार्ग मोकळा..

प्रकरण काय?

तृणमूल काँग्रेसकडं ८० आमदार आहेत त्यांपैकी ५८ जणांनी बंडखोरी केली. या बंडखोर गटानं आपण तृणमूल काँग्रेसचाच गट असून आपल्या पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी याच आहेत असंही जाहीर केलं आहे. पण दोनतृतीयांश संख्येचा आमच्या वेगळ्या गटाला मान्यता देण्यात यावी, आणि या गटानं निवड केलेल्या (जे पक्षातून आधीच निलंबित झाले आहेत) ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधीपक्ष नेतेपद देण्यात यावं, असा प्रस्ताव त्यांनी विधानसभा अध्यक्षांपुढे ठेवला होता. पण तत्पूर्वीच ममता बॅनर्जी ज्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत त्यांनी आपल्या आदेशानं पक्षानं शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधीपक्ष नेता म्हणून निवडलं असून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात यावी असा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडं दिला होता.

Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगर'मध्ये ओमराजेंची सस्पेन्स एन्ट्री; 20 जूनपर्यंत 'वेट अँड वॉच'चा फॉर्म्युला!

पण या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्षाचं संख्याबळ लक्षात घेता जे फुटीर गटाकडं सर्वाधिक आहे, त्यांचा प्रस्ताव मान्य केला आणि पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि फुटीर गटाच्या ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधीपक्ष नेते बनवलं. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कोलकाता हायकोर्टात धाव घेतली. तसंच पक्षाच्या अध्यक्षाला विरोधीपक्ष नेता निवडण्याचा अधिकार आहे फुटलेल्या गटाला नाही, अशी संविधानात तरतूद असल्याचं आपल्या याचिकेत म्हटलं. त्यामुळं ऋतब्रज बॅनर्जी यांच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com