Solapur Politic's : आणखी एका पुतण्याने काकाची साथ सोडली; शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Dnyaneshwar Sapate joins Shiv Sena : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का बसला असून माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे शिवसेनेत दाखल झाले.
Dnyaneshwar Sapate joins Shiv Sena
Dnyaneshwar Sapate joins Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसत माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे शिवसेनेत दाखल झाले.

  2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या प्रवेशातून मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी दोघांनाही राजकीय शह दिला आहे.

  3. शिवसेना–भाजप युतीत जागावाटप सुरू असतानाच हा प्रवेश झाल्याने सोलापुरातील राजकारण अधिक तापले आहे.

Solapur, 26 December : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला महापालिका निवडणुकीच्या ऐन धामधुमीत सोलापूरमध्ये पुन्हा धक्का बसला आहे. माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने एकाच वेळी मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का दिला आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीची जोरदार मोर्चोबांधणी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपची महापालिका निवडणुकीसाठी युती झाली आहे. जागावाटपाची बोलणी दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. त्यातच इतर पक्षातील नेतेमंडळींना आपल्या पक्षात घेऊन एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही होताना दिसत आहे.

शिवसेनेने भारतीय जनता पक्षाकडे ४४ जागा मिळाव्यात, अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. ती करताना प्रभाग सहा आणि सातमधील सर्व जागा शिवसेनेला मिळाव्यात, असा प्रस्तावही भाजपपुढे ठेवला आहे. त्यादृष्टीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे आणि क्रांती तालीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सपाटे यांना शिवसेनेने गळाला लावले आहे. जिल्हाप्रमुख शिंदे आणि अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सपाटे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे सपाटे हे शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dnyaneshwar Sapate joins Shiv Sena
Subhash Deshmukh : सुभाष देशमुखांचा भाजपला निर्वाणीचा इशारा; ’निष्ठावंत ज्या पक्षात जातील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू’

दरम्यान, ज्ञानेश्वर सपाटे यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आज पक्षाच्या शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्यावर आरोप करत त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र, त्यांनी हे उपोषणाचा निवडलेला वेळ आणि त्यांच्या पुतण्याने साथ सोडणे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Dnyaneshwar Sapate joins Shiv Sena
Mangalvedha Politic's : मंगळवेढ्यात भेटीचे राजकारण; नगराध्यक्षा आवताडे भेटल्या एकनाथ शिंदेंना, तर ‘तीर्थक्षेत्र’चे नेते अजितदादांच्या भेटीला!

प्र.1: शिवसेनेत प्रवेश कोणी केला आहे?
उ: माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्र.2: हा प्रवेश कोणासाठी मोठा धक्का मानला जात आहे?
उ: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का आहे.

प्र.3: ज्ञानेश्वर सपाटे पुढे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत?
उ: ते शिवसेनेकडून महापालिका निवडणूक लढवणार आहेत.

प्र.4: या घडामोडीचा वेळ महत्त्वाचा का मानला जात आहे?
उ: माजी महापौर मनोहर सपाटे उपोषण करत असतानाच पुतण्याने पक्ष सोडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com