Karad politic's : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांचा भाजप आमदारांवर गंभीर आरोप;‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ‘ती’ घटना सांगितली!

Sahyadri Sugar Factory Election 2025 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निघालेल्या मिरवणुकीत सह्याद्री कारखाना आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे पाहून शड्डू ठोकणाऱ्या विरोधकांना कारखान्याचे सभासद जागा दाखवतील, असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
Manoj Ghorpade-Balasaheb Patil
Manoj Ghorpade-Balasaheb Patil Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 03 April : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे नेते निवास थोरात यांनी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने कडवे आव्हान उभारले आहे. कारखाना निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निघालेल्या मिरवणुकीत सह्याद्री कारखाना आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे पाहून शड्डू ठोकणाऱ्या विरोधकांना कारखान्याचे सभासद जागा दाखवतील, असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचा भाजप नेते मनोज घोरपडे यांनी दणदणीत मतांनी पराभव केला. त्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही घोरपडे यांनी नाराजांना सोबत घेत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते निवास थोरात यांनी तिसरा पॅनेल टाकल्यामुळे पाटील यांच्यासाठी थोडीशी जमेची बाजू ठरली आहे. कारण, विरोधातील मतविभागणीचा फायदा सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांनाच अधिक होण्याची शक्यता आहे. मात्र, घोरपडे आणि थोरात यांनी मोठी वातावरण निर्मिती केली आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासमोरील (Sahyadri Sugar Factory) पुलावरून मिरवणूक निघाली असताना कारखाना आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर शड्डू ठोकण्यात आला. ज्या ३२ हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे आणि ज्यांच्या कष्टातून कारखान्याची उभारणी झाली आहे, ज्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे, त्यांचा तुम्ही शड्डू ठोकून अपमान करता, तुम्हाला स्वाभिमानी सभासद जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

Manoj Ghorpade-Balasaheb Patil
Dilip Mane : दिलीप मानेंनी टायमिंग साधलं; बाजार समिती निवडणूक रंगत असतानाच ‘दोस्ती अस्त्र’ काढले बाहेर, पालकमंत्र्यांशी बंद खोलीत चर्चा, दुपारी भोजन

प्रचारात वैयक्तीक पातळीवर आरोप प्रत्यारोपाला होऊ लागले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विद्यमान आमदार घोरपडे यांच्यावर टीकास्त्र सोडताना निवडणुकांमध्ये हार जीत होत असते; परंतु अपघाताने मिळालेल्या सत्तेमुळे काही लोक बेभान झाले आहेत, त्यांनी कारखान्याच्या समोर असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे पाहून शड्डू ठोकला होता, ही संस्कृती कराडमध्ये वाढत असून त्या प्रवृत्तीला सह्याद्रीचे सुजाण सभासद वेळीच चाप लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनाच आता बदल हवा आहे त्यामुळे त्यांनीही निवडणूक हातात घेतली आहे कारखान्याच्या सध्याच्या कारभारात एकही सभासद समाधान नसून कारखान्याचे अध्यक्षांनी त्यांचे कुटुंबीय फक्त समाधानी आहेत त्यामुळे आता सभासदांनाच निवडणुकीत बदल हवा आहे सत्ता आल्यावर तो बदल कसा असतो हे आम्ही दाखवून देऊ असे मनोज घोरपडे यांनी पलटवार केला आहे.

Manoj Ghorpade-Balasaheb Patil
Mallikarjun Kharge : ...तर मी राजीनामा देईन! खासदाराचे आरोप खर्गेंच्या चांगलेच जिव्हारी, संताप अनावर...

पॅनेल म्हणून जोमाने निवडणूक लढवणार : निवास थोरात

काँग्रेसचे निवास थोरात यांनी मोठ्या तयारीने निवडणुकीसाठी दंड थोपटले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवास थोरात यांचा अर्ज अवैध ठरवला होतात, त्यावेळी त्यांनी सहकार आयुक्तांकडे दाद मागितली होती, सहकार आयुक्ताने थोरात यांचा अर्ज वैध ठरवला होता. पण, त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्या याचिकेवर निकाल देताना निवास थोरात यांचा अर्ज अवैध ठरवण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला, थोरात हे निवडणुकीतून बाद झाले आहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून आम्ही बाहेर फेकलो गेलो असले तरी पॅनेल म्हणून आपण जोमाने आणखी तयारी करून निवडणूक लढवू, असे निवास थोरात यांनी सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com