Solapur News : इराणवरील हल्ल्याचा विनापरवाना निषेध करणे माजी आमदाराला भोवले; आंदोलन केल्याने 26 जणांवर गुन्हा

Narsayya Adam Crime : माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इराणवरील कारवाईच्या निषेधार्थ विनापरवाना आंदोलन केल्याने त्यांच्यासह २६ जणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
Narsayya Adam
Narsayya AdamSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 March : सोलापुरात विनापरवाना आंदोलन करणे माजी आमदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. जमाव बंदीचा आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी (ता. 04 मार्च) इराणवरील लष्करी कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवाना आंदोलन केले होते.

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार आडम, अनिल अंबादास वासम, युसुफ हनीफ शेख, नसीमा घुडुभाई शेख, नलिनी छगन कलबुर्गी (सर्व रा. सोलापूर) यांच्यासह 26 जणांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापुरातील (Solapur) सदर बझार पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी फिर्याद दिली होती.

सध्या अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. त्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी (ता. ४ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास माकपने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी त्यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही माकपने सकाळी ११.२० ते दुपारी तीन या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले होते.

Narsayya Adam
Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरणार सोलापूरच्या तिसऱ्या नेत्या; दिग्गजांच्या पंक्तीत मिळाले स्थान...!

या आंदोलनावेळी काळे झेंडे दाखवत घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. माजी आमदार नरसय्या आडम आणि माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Narsayya Adam
Satara ZP : झेडपी अध्यक्षपदाचा डाव राष्ट्रवादी भाजपवर उलटवणार; शिवेंद्रराजे, गोरे, अतुल भोसले समर्थकांचे वाढविले टेन्शन

या आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने - सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य वाद टळला होता. माकपने विनापरवाना निषेध आंदोलन करून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फौजदार साखरे तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com