

Solapur, 11 June : विधान परिषदेच्या निवडणुकीला एक आठवड्याचा कालावधी उरलेला असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज सोलापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला महाविकास आघाडीच्या पाच आजी-माजी आमदारांनी हजेरील लावल्याने ती विशेष गाजली. मात्र, भाजपकडून इच्छूक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांची या बैठकीला अनुपस्थिती होती. परिचारक आजारी असल्यामुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारकही उत्सुक होते. मात्र, भाजपकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदार परिचारक यांच्यासह त्यांचे समर्थकही नाराज झाले होते.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रशांत परिचारक यांची पंढरपुरात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपण राऊत यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. चार दिवसांपूर्वी खुद्द माजी आमदार प्रशांत परिचारक हे राऊत यांच्या प्रचारात सक्रीस सहभागी झाले होते.
मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला येथील बैठकीला प्रशांत परिचारक उपस्थित होते. मात्र, आज सोलापुरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या बैठकीला माजी आमदार परिचारक हे अनुपस्थित होते. मात्र, ते आजारी असल्याने प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या पाच आजी-माजी आमदारांची हजेरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे चार विद्यमान आमदार, तर माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.