Ajit Pawar : तुम्ही संजयमामाला पुन्हा आमदार करा, मी ‘आदिनाथ, मकाई’ला चांगले दिवस दाखवेन; अजितदादांचा वादा

NCP's Jansanman Yatra : करमाळा तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा राहावा; म्हणून गोविंदबापू पाटील माझ्याकडे येत असत. मला सांगायचे की आदिनाथ कारखाना उभा राहिला पाहिजे. जोपर्यंत आदिनाथ कारखाना उभा राहत नाही; तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती.
Ajit Pawar-Sanjay Shinde
Ajit Pawar-Sanjay ShindeSarkarnama
Published on
Updated on

Karmala, 24 September : तुम्ही संजयमामाला करमाळ्यातून पुन्हा एकदा आमदार करा. करमाळा तालुक्यातील आदिनाथ आणि मकाई सहकारी साखर कारखान्याला चांगले दिवस आणून दिले नाही तर अजित पवार नाव सांगणार नाही, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील जनतेला केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करमाळा येथे जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी करमाळ्यातील जनतेला पुन्हा एकदा संजय शिंदेंना निवडून देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, करमाळा (Karmala) तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा राहावा; म्हणून या तालुक्यातील रुबाबदार व्यक्तिमत्व गोविंदबापू पाटील माझ्याकडे येत असत. मला सांगायचे की आदिनाथ कारखाना उभा राहिला पाहिजे. तोपर्यंत आदिनाथ कारखाना उभा राहत नाही; तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. कारखाना उभा राहिल्यानंतरच त्यांनी पायात चप्पल घातली.

Ajit Pawar-Sanjay Shinde
Akshay Shinde Encounter : दोन पोलिसांमध्ये बसलेल्या अक्षय शिंदेने पुढच्या पोलिसाचा रिव्हॉल्व्हर काढलाच कसा? जयंत पाटलांचा सवाल

अशा पद्धतीने उभा राहिलेल्या आदिनाथ सहकारी कारखान्याची आज काय अवस्था आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ आणि मकाई हे दोन्ही साखर कारखाने बंद आहेत. तुम्ही संजय शिंदे यांना पुन्हा एकदा आमदार करा. मी या दोन्ही कारखान्याला ऊर्जितावस्था आणून देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. उजनी बॅक वॉटर परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस आहे. करमाळा तालुक्यातुन 10 साखर कारखाने ऊस घेऊन जातात. अशा परिस्थितीत तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद राहणे, हे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे आहे

माझ्या बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. हे दोन्ही साखर कारखाने उसाला महाराष्ट्रात एक नंबरचा भाव देतात. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 3636 रुपये, तर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 3571 रुपये भाव देतो.

Ajit Pawar-Sanjay Shinde
Sudhir Mungantiwar : सरकारच्या लोकप्रिय योजनांत खोडा घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण? मुनगंटीवारांनी कोणाला दिला इशारा...

तुम्ही म्हणाल की ‘मग अंबालिका कारखाना का एवढा भाव देत नाही. अंबालिकावर सध्या कर्ज आहे. ते कर्ज एकदाचे फिटू द्या. मग अंबालिका कारखानाही एक नंबरचा भाव देईल, असा विश्वास अजित पवार यांनी बोलून दाखवला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com