Patan News : सणबूरला घरात आढळले चौघांचे मृतदेह; आत्महत्या की घातपात तपास सुरु...

Patan taluka पाटण तालुक्यातील सणबूर येथे गावापासून काही अंतरावर रुवलेकडे जाणाऱ्या मार्गाकडेला जाधव कुटुंब वास्तव्यास आहेत.
Sabnur In Patan
Sabnur In Patansarkarnama
Published on
Updated on

-राजेश पाटील

Patan News : सणबुर (ता.पाटण) : येथील एका घरात आज चार मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वृध्द आई,वडील तसेच त्यांचा मुलगा आणि विवाहित मुलीचा मृतात समावेश आहे. हा घातपात,आत्महत्या की अन्य काही कारण याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू असून विविध पोलिस पथके तपासासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून Police मिळालेल्या माहितीनुसार पाटण Patan तालुक्यातील सणबूर येथे गावापासून काही अंतरावर रुवलेकडे जाणाऱ्या मार्गाकडेला जाधव कुटुंब वास्तव्यास आहेत. आनंदा पांडुरंग जाधव काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर कराड येथे वैद्यकीय उपचार सुरु होते.

दरम्यान उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. रात्री घरी त्यांच्यासह पत्नी,मुलगा आणि विवाहित मुलगी असे चौघेजण होते. आज सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडलेला नसल्याचे आढल्याने व हाका मारूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडला.त्यावेळी चौघेही अंथरुणात मृतावस्थेत पडलेले आढळून आले.

ढेबेवाडीसह विविध ठिकाणची पोलिस तपास पथके घटनास्थळी दाखल झाली असून हा घातपात, आत्महत्या की अन्य काही कारण याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे.दुपारी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडला नेण्यात आले आहेत. त्याच्या अहवालानुसारच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

Sabnur In Patan
Satara News : सातारचे जिल्हाधिकारी ॲक्शनमोडवर; दरडग्रस्त गावांची केली पाहणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com