

Karad, 06 January : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्याधुनिक, सेंद्रीय शेती केली आहे, हे मी वनमंत्री गणेश नाईकांना दाखवायला तयार आहे. शिंदे नगरसेवक असल्यापासून त्यांचा ओढ शेती, गावाकडे आहे. फोटोसाठी येणारा तो नेता नाही. नाईक यांनी एकनाथ शिंदे यांची चिंता करण्याचे कारण नाही, असा टोला शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी वनमंत्री नाईकांना लगावला.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड नगरपालिकेतील आढावा बैठकीसाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आले होते. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नाईकांना सुनावले. वनमंत्री नाईक यांनी उपमुख्यंत्री शिंदे यांच्यावर देर गावातील शेतीवरून टीका केली होती. त्याला देसाईंनी उत्तर दिले.
गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दरे गावात यावे, एकनाथ शिंदे यांनी तेथे जाऊन फोटो काढण्यापुरती शेती केली आहे की प्रत्यक्ष आधुनिक शेती केली आहे, ते नाईकांनी पाहावे. शिंदे यांनी अत्याधुनिक, सेंद्रीय शेती केली आहे, हे मी नाईकांना दाखवायला तयार आहे. शिंदे नगरसेवक असल्यापासून त्यांचा ओढ शेती, गावाकडे आहे. फोटोसाठी येणारा तो नेता नाही, असेही देसाई यांनी नाईक यांना सुनावले.
साताऱ्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, पालकमंत्री कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत, अशी टिका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावर पालकमंत्री देसाई म्हणाले, सुषमा अंधारे मुंबईत माध्यमांपुढे बोलतात. माझ्याकडे सांगली महापालिका निवडणुकीची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी आहे.
मी कालच सांगलीला जाऊन आलो. आता नवी मुंबई महापालिकेकडे निघालो आहे. सुषमा अंधारे यांना मुंबईतून बोलायला काय लागतयं? आम्ही लोकांत आहे. साताऱ्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडलेली नाही. त्यासंदर्भात त्यांच्याशी थेट चर्चा करायची आमची तयारी आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची काळजी अंधारे यांनी करायची गरज नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ठाण्याचा रहेमान डकेत असा उल्लेख खासदार संजय राऊत यांनी केला. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले, सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे एकमेकांचे आवळे-जावळे बहीण-भाऊ आहेत. त्यांना माध्यमांपुढे बोलण्याशिवाय दुसरे काहीच काम नाही.
संजय राऊत यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या; मात्र नगरपालिका निवडणुकीत राज्यात भाजपपाठोपाठ दुसरा पक्ष म्हणून शिंदे यांची शिवसेना आहे. राज्यातील लोकांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले आहे. तुमची काय अवस्था झाली आहे, हे संजय राऊत यांनी पाहावे. त्यांनी असेच बोलत राहावे, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नंबर खाली-खाली जात राहील.
ते लोक आपले अपयश झाकायला असं बोलतात
महापालिकेत जे उमेदवार बिनविरोध झाले आहेत, त्यावर विरोधी पक्षांकडून शिवसेनेचे लोक जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावत आहेत, असे आरोप केले जात आहेत. त्यावर देसाई म्हणाले, राज्यात एक नंबरला भाजपचे नगरसेवक निवडून आले. दुसरा क्रमांक शिवसेनेचा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तर तो दम देऊन आला आणि इतर पक्षाचे बिनविरोध झाले तर लोकशाही मार्गाने आले, असे होत नाही. ज्याला स्वतःच्या पक्षाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आणता आले नाहीत, ज्यांच्यावर विश्वास नाही, ते लोक अपशय झाकायला असे बोलतात. मात्र लोकशाही मार्गानेच नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.