Prakash Abitkar : कामचुकार अधिकाऱ्यांना घरी पाठवा; पालकमंत्री आबिटकरांनी आयुक्तांना खडसावले

Negligent officers action News : कोल्हापूर महानगरपालिकेतील काही जबाबदार अधिकाऱ्यांमुळे शहरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत या सर्व घटनांमध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
Kolhapur Meeting
Kolhapur Meeting Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूरची झालेली दुरावस्था, विस्कळीत पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी सारख्या समस्यांमुळे राज्यभरात बदनामी होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील काही जबाबदार अधिकाऱ्यांमुळे शहरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत या सर्व घटनांमध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिकेच्या आढावा बैठकीत आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना दिले आहेत.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी कोल्हापूर महापालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित उर्फ नाना कदम, शारंगधर देशमुख, आदिल फरास यांच्यासह आयुक्त के. मंजूलक्ष्मी, उपायुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते.

Kolhapur Meeting
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लाडक्या बहिणींना नवी उपमा, पगारी मतदार! शेतकऱ्यांचे दु:खही सांगितलं!

कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून पालकमंत्री आणि आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी अधिकाऱ्यांना झापले. कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचे काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेला लुटायचे आणि ठेकेदारांचे खिसे भरायचे, असा धंदा अधिकाऱ्यांनी चालवला आहे. अधिकाऱ्यांची मनमानी आणि वेळकाढूपणा खपवून घेणार नाही. विभागीय अधिकारी रस्ते कामावर नजर का ठेवत नाहीत? त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना केली आहे.

Kolhapur Meeting
Balasaheb Thackeray: रामदास कदमांच्या दाव्याप्रमाणे खरंच बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस घरी होता? त्यांचा मृत्यू कधी झाला होता अन् घोषणा कोणी केली?

100 कोटींचे रस्ते वेळेत आणि मिशन म्हणून पूर्ण करा. मी कोणत्याही अधिकाऱ्याला जबाबदार धरणार नाही, आयुक्त मॅडम यांना मी जबाबदार धरणार आहे. हे अधिकारी काम कामचुकारपणा करत असतील तर त्यांना हाकलून द्या, असा दम पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.

Kolhapur Meeting
Shivsena Dasara Melava: रामदास कदम यांचं दसरा मेळाव्यात धक्कादायक विधान; म्हणाले,'बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस…'

फुलेवाडी दुर्घटनेबाबत जाब विचारला

फुलेवाडी दुर्घटनेत महापालिकेच्या साईट अभियंत्यांवर कारवाई का झाली नाही? त्यांनी कामाची पाहणी करणे गरजेचे होते, फक्त ठेकेदार दोषी कसा? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही. याचे उत्तर द्या. घटनेतील संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

Kolhapur Meeting
Uddhav Thackeray: 'स्थानिक'च्या निवडणुकीचा अजेंडा ठाकरेंकडून सेट; भाजप, फडणवीसांसाठी चक्रव्यूह !

स्क्रॅप चोरी करणारा अधिकारी कोण ?

अधिकाऱ्यांनो सिरियस घ्या, आम्ही लोकांची भूमिका तुम्हाला सांगतोय. शहर पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीवर डीपीप्लॅन तयार करा, अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी दिल्या आहेत. या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महापालिकेच्या भूखंडावर प्रायव्हेट बिल्डरने बिल्डिंग बांधले आहेत. यावर अधिकारी वर्ग कारवाई करत नाही. स्क्रॅप चोरी करणारा अधिकारी कोण? यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर अधिकाऱ्यांवर भडकले.

Kolhapur Meeting
Uddhav Thackeray News : रामदास कदम यांना 'करारा जवाब' मिळणार; ठाकरेंनी सर्वात विश्वासू शिलेदारावर टाकली महत्वाची जबाबदारी  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com