

Gokul News : गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेल्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणाचे आणि अध्यक्ष निवडीत निर्माण झालेल्या प्रकारावर पडदा पडल्याने आता सर्व काही सुरळीत होईल असे चिन्हे आहेत. अशातच शनिवारी गोकुळ दूध संघाची पहिली संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून अध्यक्ष निवडीचे पडसाद उमटणार की मैत्री पूर्ण कारभार करणार याबाबत सतेज पाटलांच्या समविचार आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
गोकुळचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांची पहिली संचालक मंडळाची बैठक शनिवारी (ता. १४) होत आहे. यामध्ये पशुखाद्य, दूध दर, दुधाचे संकलन, दुष्काळी पार्श्वभूमी अशा अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. गोकुळ शिरगाव येथील संघाच्या मुख्य कार्यालयात ही बैठक होईल.
गोकुळमधील प्रशासकीय राजवट अखेर दहा नोव्हेंबरला संपली. ४ मे २०२६ रोजी यापूर्वीच्या संचालकांची मुदत संपली. त्याचवेळी निवडणूक प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे प्रशासकीय मंडळांची नियुक्ती केली. नूतन अध्यक्ष पाटील शुक्रवारी (ता. १३) प्राथमिक माहिती घेणार असून, शनिवारी (ता. १४) संचालकांची पहिली बैठक घेणार आहेत.
प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत झालेल्या कारभाराचा आढावा घेणार आहेत. बैठकीसाठी विजयी झालेले २५ आणि शासननियुक्त चार संचालक उपस्थित राहणार आहेत.
प्रशासक काळामध्ये जी गोकुळची अवस्था झाली आहे त्यातून बाहेर पडलं पाहिजे. संचालक मंडळाने जे चुकीचे निर्णय झाले आहेत ते बदलून दूध उत्पादक हितांचे निर्णय घेतले पाहिजे.दुधाचे संकलन कमी झालेला आहे.दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.सध्या दुष्काळाचे दिवस आहेत त्यामुळे इतर जिल्ह्यातून दूध पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या गोकुळ दुधाला सोन्याचा भाव मिळणार आहे. संघाला जास्त वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.