Gokul Chairman : सतेज पाटलांविरोधात रणनीती ठरली, 'गोकुळ'चे अध्यक्षपद भाजपकडे? 'ही' दोन नावे चर्चेत

Gokul Chetan Narke Ambarish Ghatge : 'गोकुळ'च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्धार महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला.
 Gokul Election | Chairman Post | 25 Directors
Gokul Election | Chairman Post | 25 DirectorsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Politics : गोकुळच्या अध्यक्षपद मिळण्याची रणनीती महायुतीच्या नेत्यांनी आखली आहे. शहरालगत एका नेत्यांच्या फार्महाऊसवर झालेल्या बैठकीला एकत्रित फराळ करण्याचे निमित्ताने बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष निवडीबाबत खलबते झाली.

शिवसेना शिंदे पक्षांकडून सद्यःस्थितीत सावध हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून इतक्यात अध्यक्षपद नको, असा सावध पवित्रा घेतला आहे. त्यातच या निवडीनंतर दुसऱ्याच दिवशी सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेची सुनावणी आहे. त्याच्या निकालावरही राजकीय समीकरण अवलंबून असल्याने निवडणूक लढवायची झाल्यास भाजपला पहिल्यांदा संधी देण्याचे ठरले.

भाजपकडून या पदासाठी सध्या तरी डॉ. चेतन नरके यांचे नाव आघाडीवर आहे. अन्यथा अंबरिष घाटगे यांना संधी मिळू शकते.

'गोकुळ'ची अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (ता. १०) आहे. कोरमअभावी २९ ऑक्टोबरची संचालकांची बैठक तहकूब झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने ही निवडणूक १० नोव्हेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत 'समविचारी'चा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही, यासाठी संघात चार शासननियुक्त संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा हक्क देण्याचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे संघाची सत्ता महायुतीकडे जाईल, अशी शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शासननियुक्त संचालकांची नावे व अध्यक्षपदाचा महायुतीचा उमेदवार ठरवण्यासाठी आज नेत्यांची बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, 'जनसुराज्य'चे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शासन नियुक्त संचालक म्हणून ज्यांची नावे चर्चेत आहेत तेही चौघे उपस्थित होते.

 Gokul Election | Chairman Post | 25 Directors
Gokul : 'गोकुळ'चा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी!

शासन नियुक्त संचालकांची नावे यापूर्वीच निश्चित झाली आहेत. तथापि यात काही बदलाचे संकेतही या बैठकीतील चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अध्यक्षपदासाठी कोणाचा अर्ज दाखल करायचा यावरही बैठकीत चर्चा झाली. सद्यःस्थितीत सत्ता मिळवण्यासाठी कायद्यात केलेल्या बदलावरून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रान उठवले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही गटांनी चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. प्रत्यक्ष अध्यक्ष निवडीत काय होणार? हा 'सस्पेन्स' महायुतीकडून कायम आहे.

आज पुन्हा बैठक

गोकुळ'मधील शासननियुक्त संचालक नियुक्ती अध्यादेशाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंच व संभाजीनगर खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल झाल्या आहेत. त्याची सुनावणी आज होणार आहे. या सुनावणीत काय होते, त्यानंतर पुन्हा रणनीती ठरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक होणार आहे.

 Gokul Election | Chairman Post | 25 Directors
Gokul News: गोकुळ दूध संघात पुन्हा नवा ट्विस्ट! महायुतीचे संचालक 'समविचारी'च्या संचालकांविरोधात दाखल करणार यचिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.