Gokul : 'गोकुळ'चा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी!

Gokul Police Crime : वाद मिटवण्याच्या प्रयत्नादरम्यान १० ते १२ जणांनी शरद पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. करवीर पोलीस ठाणे येथे दहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Crime Update
Crime UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : गोकुळ दूध संघाचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. एका माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हिरवडे दुमाला येथे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या चर्चेतून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी करवीर पोलीस ठाणे येथे दहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी शरद गणपती पाटील यांना बोलावण्यात आले होते. मात्र, वाद मिटवण्याच्या प्रयत्नादरम्यान १० ते १२ जणांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीबाहेरही त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर घरी गेल्यानंतर पुन्हा बाहेर पडलेल्या वेळी त्यांच्यावर मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शरद गणपती पाटील यांनी यासंदर्भात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गेल्या तक्रारीनुसार,

दरम्यान, बाजीराव हरी पाटील,सदाशिव दिनकर यादव, शिवाजी दिनकर यादव, संभाजी शामराव यादव, समीर संभाजी यादव, सुधीर संभाजी व्यादव, ऋषीकेश शिवाजी यादव, श्रीवर्धन, सदाशिव यादव, निवास श्रीपती यादव, समीर 'शिवाजी यादव (सर्व रा. रा. हिरवडे दुमाला) या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Crime Update
Gokul News: गोकुळ दूध संघात पुन्हा नवा ट्विस्ट! महायुतीचे संचालक 'समविचारी'च्या संचालकांविरोधात दाखल करणार यचिका

मिळालेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबर रोजी फिर्यादी शरद पाटील हे शेतातून घरी जात असताना गावातील शाळेजवळ बाजीराव पाटील यानी थांबवुन मला काल झालेला वाद ग्रामपंचायतमध्ये या आपण मिटवुन घेऊया असे सांगितले. त्यावर वाद बाबत चर्चा करत असताना मी सर्वाना हात जोडून माझी चुकी झाली असे म्हणत असताना 10 जणानी शिवीगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण केली असल्याचं तक्रारदार शरद पाटील यांनी म्हटले आहे.

Crime Update
Satej Patil : सतेज पाटील 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, मुंबईत दाखल; सरकार विरोधात डाव टाकणार, 'गोकुळ' राज्यभर गाजणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.