

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीत राष्ट्रवादीला ९ जागा देण्यात आल्यात आहेत. पण यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाच्या एका जागेचाही समावेश आहे. भाजप आणि शिवसेना प्रत्येकी ७ आणि जनसुराज्य शक्तीसाठी २ अशा फॉर्म्युल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते. मात्र या फॉर्म्युल्यावर मंत्री हसन मुश्रीफ कमालीचे नाराज असल्याचे वृत्त आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, जन सुराज्य शक्ती पक्षाने मोट बांधली आहे. मात्र जागा वाटपाचा निर्णय कोल्हापुरात होऊ शकला नाही. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. तेथे चर्चा झाली मात्र निर्णय नंतर दिला जाईल, असे ठरले होते. त्याबाबतचा निर्णय शनिवारी रात्री झाला.
हसन मुश्रीफ नाराज :
राष्ट्रवादी आणि यड्रावकर गट यांच्याकडे अधिक ठरावधारक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीला किमान १० जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र त्यामध्ये यड्रावकर गटाला सहभागी करून ८+१ अशा ९ जागा देण्यात आल्या आहेत. जास्त ठरावधारक असतानाही कमी जागा वाट्याला आल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
हसन मुश्रीफ यांनी बैठक संपताच पॅनेलचे नेतृत्व केले जाईल पण बाहेरून पाठिंबा देणार असल्याचा निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविला आहे. त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरीही तो रात्री उशिरापर्यंत जाहीर केला नसल्याचे समजते. याबाबत मंत्री मुश्रीफ यांच्याकडे प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला मात्र तो होऊ शकला नाही.
अंतिम झालेले जागा वाटप :
राष्ट्रवादीला ९ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्यामध्येच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना १ जागा द्यावी लागणार आहे. तसेच भाजप आणि शिवसेना यांना प्रत्येकी ७ आणि उर्वरीत २ जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. याबाबत मुंबईत रात्री उशिरापर्यंत घडामोडी सुरू होत्या.
संचालकांच्या २५ जागांचे वाटप सध्या निश्चित झाले असले तरीही उर्वरीत २ स्वीकृत सदस्य आणि १ शासन नियुक्त अशा ३ जागांमध्ये राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा प्रमुख ३ पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचे निश्चित झाल्याचेही समजते. एकूणच सर्व जागांबाबत अधिकृत निर्णय कोणत्याही पक्षाने किंवा खुद्द मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.