

Gokul Election Results News: जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलमधील मंडलिक-मुश्रीफ गटातील अंतर्गत संघर्ष आजच्या निकालामुळे पुन्हा उफाळून आला. त्यातून गेल्या निवडणुकीतील पराभूत ॲड. वीरेंद्र मंडलिक विजयी झाले; तर मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांना पराभव स्वीकारावा लागल्याचे चित्र गोकुळच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.
गतनिवडणुकीत मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विनय कोरे यांच्यासह सर्व महाडिक विरोधकांची मोट बांधण्यात आली. त्यात माजी खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर या शिवसेना नेत्यांचाही समावेश होता. जागा वाटपात शिवसेनेकडून मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र यांच्यासह त्यांच्या आत्या व माजी आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता यांनाही उमेदवारी मिळाली होती. निकालात वीरेंद्र यांच्यासह सौ. सुश्मिता यांचाही मोठ्या मतांनी पराभव झाला होता.
या निकालानंतर वीरेंद्र यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासह सुश्मिता यांच्या पराभवाला मंत्री मुश्रीफ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. यावेळी गोकुळच्या निवडणुकीत पुन्हा वीरेंद्र यांच्यासह सुश्मिता यांचे पती राजेश पाटील महायुतीच्या पॅनेलमध्ये अनुक्रम शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार होते.
निकालात या दोघांचाही मोठ्या फरकांनी विजय झाला, त्याचवेळी मंत्री मुश्रीफ यांचे पुत्र नविद यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यात कागल तालुक्यासह राधानगरी, भुदरगड तालुक्यातील मंडलिक गटाच्या ठरावदारांनी नविद यांना मतदानच केले नसल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. नविद यांचा पराभव मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागला. भविष्यात मंडलिक-मुश्रीफ वाद तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.