Gokul Politics : एका पत्रकामुळे गोकुळमधील महायुतीचे मतभेद अन् मनभेद चव्हाट्यावर : विद्यमानांचा पत्ता कट करण्यासाठी बैठका

Gokul Election Mahayuti Rift : 'गोकुळ'च्या निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात समोरासमोर लढाई होणार आहे. यात महायुतीत एकसंघ असणे आवश्यक आहे. मात्र, तेथेच मतभेद दिसून येत आहेत. जागावाटपाचा तिढा कायम असतानाच यापूर्वी गोकुळ दूध संघाच्या पाच वर्षातील विरोधातील आवाजाचे संदर्भ माहिती पत्रकातून पुढे आले आहेत.
Gokul Election
Gokul ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 06 Oct : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाची निवडणूक सुरू असताना आता महायुतीमधील मनभेद आणि मतभेद संपल्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली होती. मात्र महायुतीमध्ये किती मतभेद आणि मतभेद आहेत. हे एका गटाच्या प्रचारादरम्यान वाटण्यात आलेल्या पत्रकावरून समोर येत आहे.

मागील पाच वर्षाच्या सत्ता काळात गोकुळमधील कथित गैरकारभाराच्या प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्यांचा लेखाजोखा या पत्रकातून मांडला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांसह सभासद आणि नेत्यांमध्ये देखील या पत्रकाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारात अंतर्गत मतभेद माहिती पत्रकातून पुढे येत आहेत. विद्यमानांचा पत्ता कट करण्यासाठी अंतर्गत बैठका होत आहेत. विशेष करून राधानगरी तालुक्यात हे दिसून येते आहे. गोकुळच्या निवडणुकीत अंतर्गत वादाचे पडसाद दोन दिवसांत पुढे येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Gokul Election
UP Rajya Sabha election : PM मोदी-शहांचे धक्कातंत्र, भाजपकडून सात नेत्यांचा पत्ता कट; खासदारकीसाठी नव्याना संधी देत वाढविली धडधड

'गोकुळ'च्या निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात समोरासमोर लढाई होणार आहे. यात महायुतीत एकसंघ असणे आवश्यक आहे. मात्र, तेथेच मतभेद दिसून येत आहेत. जागावाटपाचा तिढा कायम असतानाच यापूर्वी गोकुळ दूध संघाच्या पाच वर्षातील विरोधातील आवाजाचे संदर्भ माहिती पत्रकातून पुढे आले आहेत. गोकुळमध्ये कशा पद्धतीने चुकीची कामे झाले, याची माहिती प्रचारात पुढे आणली जात आहे. त्यामुळे महायुतीतील संभाव्य उमेदवारांच्या विरोधात प्रचार होत असल्याचे दिसून येत आहे.

Gokul Election
Ulhasnagar Politics : शिंदेंच्या शिवसेनेला धक्का : स्वीकृत नगरसेवक निवडणुकीलाच स्थगिती; भाजपच्या आक्षेपानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

यातून अंतर्गत मतभेद असल्याचे दिसून आल्याचे काही दूध उत्पादकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, अद्याप अधीकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही, तरीही राधानगरी तालुक्यातील एका नेत्याने आपले माहितीपत्रक दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. 'साहेबां'चे छायाचित्रही त्यावर आहे. त्यांनी आज त्यांच्या भागात कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. येथे एका विद्यमान संचालकांचा पत्ता कट करण्यासाठी ही बैठक झाल्याचेही समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com