Gokul Election: विधानसभेचा राग गोकुळ निवडणुकीत काढला; भर स्टेजवर जनसुराज्यच्या नेत्याने राष्ट्रवादीचे पितळ पाडले उघडे

Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या प्रचारादरम्यान शाहूवाडीत जनसुराज्य शक्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीतील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
Gokul Election
Gokul ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील नेत्यांनी एकत्र येत प्रचाराला सुरुवात केली असली, तरी स्थानिक पातळीवर घटक पक्षांमधील अंतर्गत धुसफूस अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. शाहूवाडी तालुक्यात आयोजित ठरावधारकांच्या मेळाव्यात जनसुराज्य शक्तीच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी मेळावा संपताच संबंधित पदाधिकाऱ्याला जाब विचारला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शाहूवाडी तालुक्यात ठरावधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महायुतीचे प्रमुख उमेदवार आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी जनसुराज्य शक्तीचे पदाधिकारी अमर खोत यांनी स्थानिक राजकारणातील विसंवादावर भाष्य केले. त्यामुळे भडकलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर यांनी मेळावा संपताच जनसुराजच्या खोत यांना जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीतील वाद मिटवून शेवट गोड झाल्याचे म्हटले असले, तरी गोकुळ दूध संघाची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कितपत पचनी पडला आहे, यावर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खोत यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एकत्र असलो तरी स्थानिक पातळीवर देखील सर्वांनी एकत्र असणे गरजेचे आहे. जशी गोकुळ दूध संघामध्ये नेत्यांची एकी झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर यांच्या गटाने देखील या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे होते. जर नेते वर असतील आणि खाली एकमेकांच्या विरोधात इतरांची तोंडे असतील. तर असे व्हायला नको, अशी भावना खोत यांनी व्यक्त केली.

Gokul Election
Devendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आणखी 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर अन्...

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी नेते एकाच व्यासपीठावर आले असले, तरी स्थानिक पातळीवरही सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. व्यासपीठावर नेत्यांची एकी दिसत असताना कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मात्र एकमेकांच्या विरोधात असतील, तर त्याचा उपयोग काय, असा सवालही खोत त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी मेळावा संपताच खोत यांना जाब विचारला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. इतकेच नव्हे तर दोघेही एकामेकांच्या अंगावर धाऊन गेल्याचा प्रकार घडला.

याबाबत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब असुरलेकर यांच्याशी संपर्क साधला असता, असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे सांगत यापुढे देखील होणार नाही असे स्पष्ट केले.

Gokul Election
Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा, महायुतीत ठिणगी? मंत्री गोरेंच्या भूमिकेने मित्रपक्षांची कोंडी

विधानसभेचा वाद

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुती म्हणून सर्वच पक्ष एकत्र लढले. अशावेळी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ हा जनसुराज्य शक्तीकडे होता. आमदार विनय कोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी पन्हाळा तालुक्यातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असुर्लेकर हे आमदार कोरे यांच्या विरोधात प्रचार करत असल्याची माहिती जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांना माहिती होती. त्यामुळे त्याचा वाद आता गोकुळ दूध संघाच्या व्यासपीठावरून समोर आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com