Gokul Election : 'गोकुळ'च्या महायुती पॅनेलमध्ये शिवाजी पाटलांना घेण्यास मनाई? भाजपाची एक तक्रार पडणार 'सब पे भारी'

Gokul Election Shivaji Patil Mahayuti Panel : गोकुळच्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये प्रथमदर्शनी महायुती एकत्र लढणार असल्याचे चित्र दिसते आहे.मात्र, यात आमदार शिवाजी पाटील यांना स्थान नसेल अशी चर्चा आहे.
Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patilsarkarnama
Published on
Updated on

Gokul Election Shivaji Patil News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने संस्था पात्र आणि अपात्रेवरून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला होता. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर हा वाद संपुष्टात आल्याची चिन्हे असताना आता जागा वाटपात कोण बाजीगर ठरणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

ज्यांच्याकडे अधिक ठराव त्याला अधिक जागा हे सूत्र अंतिम झाले असताना पुन्हा एकदा या जागा वाटपावरून महायुती मधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. एकीकडे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना महायुती मधून वगळण्याचे षडयंत्र रचले जात असताना दुसरीकडे किकवी प्रोजेक्टचा वाद देखील या संघर्षाला कारणीभूत ठरणार आहे.

गोकुळच्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये प्रथमदर्शनी महायुती एकत्र लढणार असल्याचे चित्र दिसते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार शिवाजी पाटील यांना गोकुळच्या पॅनेल मध्ये जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यातील दोन महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीत दोघांनीही आपल्या संचालकांना कसा त्रास झाला. शिवाय जागावाटपात आपला वाटा किती असावा, शिवाय पुढील रणनीती कशी असावी यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून वस्तुस्थिती मंडण्याची भूमिका दोन्ही नेत्यांच्या चर्चेतून समोर आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार शिवाजी पाटील यांना वगळून महायुतीचे पॅनल करण्यावर भर दिला जात असून आमदार पाटील यांचा महायुतीच्या पॅनलमध्ये समावेश नको, यासाठी महायुतीचे काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याच समोर आले.

Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
776 रस्त्यांच्या कामांवरून खळबळ; 776 टेस्ट रिपोर्टवरच प्रश्न, कोर्टाने पोलिसांना दिला 30 दिवसांचा वेळ

आमदार शिवाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कथित भ्रष्टाचाराच्या नावाखाली गोकुळला बदनाम केल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून गोकुळ दूध संघाच्या संस्थांसह माजी संचालक आणि नेत्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना वगळूनच हे पॅनेल तयार करण्याची परवानगी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीतील सूत्रानुसार जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तत्पूर्वी त्यांच्या संस्था अपात्र करण्यासाठी आदर्श शक्तीकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र न्यायालयाच्या निकालात अदृश्य शक्तीला धक्का मिळाला. अशातच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी खरेदी केलेला पुण्यातील किकवी प्रोजेक्ट हा देखील अंतर्गत संघर्षाचा मुद्दा बनू शकतो. सध्या भाजपकडे अधिक ठराव नसले तरी जागा वाटपामध्ये किकवी प्रकल्पावरून मोठ्या तडजोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय आहे किकवी प्रोजेक्ट?

गोकुळ दूध संघाकडून पुण्यातील किकवी प्रोजेक्ट हा 95 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या खरेदी संदर्भातील विषय मंजूर केला होता. प्रत्यक्षात या प्रोजेक्टची खरेदी किंमत आणि गोकुळ कडून खरेदी करण्यात आलेल्या किमतीमध्ये तफावत असल्याचा आरोप शिवसेनेसह भाजपने केला आहे. त्यामुळे या प्रोजेक्ट मधून अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 17 सप्टेंबर पर्यंत त्याचा अहवाल येणे अपेक्षित असून त्यामध्ये अनेक जण दोषी आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक संचालक यामध्ये तडजोडी करण्याच्या मानसिकतेत असल्याचे माहिती समोर येत आहे.

चौकशी रखडली

यापूर्वी देखील या प्रोजेक्टची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र जाणून बुजून ही चौकशी रखडवण्यात आली होती. मात्र संस्थाचा निकाल लागल्यानंतर चौकशीची चक्रे गतिमान फिरली आहेत. या अहवालाच्या माध्यमातून माजी संचालकांना रोखण्याच्या प्रयत्न आहे. या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी संघाच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी देखील केली होती. त्यानंतर प्रकाश बेलवाडे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आणि उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी या खरेदीत व प्रकल्पाच्या किमतीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
Gokul Election : गोकुळ ‘बिनविरोध’ची चर्चा कुठून सुरु झाली? महाडिकांसाठी फडणवीसांना मैदानात उतरवलं? सतेज पाटलांनी उधळला सगळा प्लॅन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com