Police Employee Suicide : पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला नवे वळण; पत्नीविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावे

FIR registered against wife in suicide case: डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ यांच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
Police suicide case shocking claims emerge
Police suicide case shocking claims emergeSarkarnama
Published on
Updated on

Dombivli Police Suicide Case: डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ यांच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

या प्रकरणात त्यांच्या पत्नी शिवगंगा शिरसाठ उर्फ शिवगंगा श्रीराम मिसाळ हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून, त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

श्रीराम मिसाळ यांनी 28 एप्रिलला मध्यरात्री त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरवातीला आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नव्हते.

मात्र, कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत पोलिसांकडे (Police) तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पत्नीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृताचे भाऊ लक्ष्मण मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीराम आणि शिवगंगा यांचा विवाह 2011 मध्ये झाला होता. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच शिवगंगा माहेरी गेली आणि त्यानंतर ती सासरी मुक्कामी राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच लग्नाच्या दिवशीच हा विवाह मान्य नसल्याचे तिने सांगितल्याचा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे.

Police suicide case shocking claims emerge
Girlfriend Family Assault : लव्ह स्टोरीचा दुर्दैवी शेवट! प्रेयसीसोबत दिसताच, बेदम मारहाण; नैराश्यात युवकानं संपवलं जीवन, मुलीच्या वडिलांना अटक

फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपांनुसार, गेल्या 15 वर्षांपासून शिवगंगाकडून श्रीराम यांचा सातत्याने मानसिक छळ केला जात होता. पगार, पद आणि वरिष्ठतेवरून टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे, कुटुंबीयांबाबत खोटे आरोप करणे तसेच घरात प्रवेश नाकारण्यासारख्या प्रकारांमुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते, असा दावा करण्यात आला आहे.

Police suicide case shocking claims emerge
Female Lawyer Suicide Case : गेट वे ऑफ इंडियाजवळ सापडला महिला वकिलेचा मृतदेह; 40 कोटींच्या डीलमागील गूढ? ज्येष्ठ विधिज्ञाभोवती कारवाईचा फास

फिर्यादीनुसार, एका सहकारी पोलिस कर्मचाऱ्यासोबत पत्नीचे कथित अनैतिक संबंध असल्याचा संशय श्रीराम यांना होता. या संशयावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दाव्यांची सत्यता अद्याप तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

आत्महत्येपूर्वी भावाकडे व्यक्त केली होती व्यथा

लक्ष्मण मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी काही दिवस श्रीराम यांनी वारंवार फोनवरून मानसिक त्रासाबाबत आपली व्यथा मांडली होती. इतकेच नव्हे तर आत्महत्येचा इशाराही त्यांनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील कथित ऑडिओ रेकॉर्डिंग तपास यंत्रणांकडे सादर करण्यात आले असून त्याची पडताळणी सुरू आहे.

ऑडिओ रेकॉर्डिंगसह अनेक पुरावे पोलिसांकडे

या प्रकरणात मोबाईलवरील संभाषणे, कथित ऑडिओ रेकॉर्डिंग, कागदपत्रे आणि अन्य डिजिटल पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. या सर्व पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

दोन जणांच्या चौकशीचीही मागणी

फिर्यादीत पोलिस उपनिरीक्षक संगप्पा भुजबळ तसेच किरण फुले नावाच्या महिलेचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांचीही चौकशी करण्यात यावी आणि तपासात त्यांचा कोणताही संबंध आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मण मिसाळ यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले असून त्यांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com